पुण्यात तब्बल २३ जणांपेक्षा  भारी पडले होते नोटाचे व्होट !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 11:00 PM2019-04-13T23:00:00+5:302019-04-13T23:00:06+5:30

पुणे लोकसभा मतदारसंघात २०१४ मध्ये २९ उमेदवार नशीब आजमावत होते़. मात्र, त्यातील तब्बल २३ उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते मिळाली़.

nota option strong against 23 canditate in pune | पुण्यात तब्बल २३ जणांपेक्षा  भारी पडले होते नोटाचे व्होट !

पुण्यात तब्बल २३ जणांपेक्षा  भारी पडले होते नोटाचे व्होट !

Next
ठळक मुद्देयंदा ३१ उमेदवार रिंगणात आहेत़ त्यापैकी किती जणांना नोटापेक्षा कमी मते मिळतात़ ते पाहणे उत्सुकतेचं

पुणे : पुणेलोकसभा मतदारसंघात २०१४ मध्ये २९ उमेदवार नशीब आजमावत होते़. मात्र, त्यातील तब्बल २३ उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते मिळाली़. पुणे लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत नोटा ला ६ हजार ४३८ मते मिळाली होती़ नोटा पेक्षा २३ अपक्षांना कमी मते मिळाली असून त्या सर्वांना मिळून एकूण १८ हजार ५४८ मते मिळाली होती़. या निवडणुकीत तिसºया क्रमांकाची मते मनसेचे दीपक पायगुडे यांना ९३ हजार ५०२ मते मिळाली होती़ त्यापाठोपाठ आप चे उमेदवार सुभाष वारे यांना २८ हजार ६५७ मते मिळाली होती़. बसपचे इम्तीयाज पिरजादे यांना १४ हजार ७२७ मते, तसेच अपक्ष अरुण भाटिया यांना ७ हजार २२२ मते मिळाली होती़. अपक्ष उमेदवारांपैकी फक्त ७ जणांना चार आकडी संख्या गाठता आली होती़. यंदा ३१ उमेदवार रिंगणात आहेत़ त्यापैकी किती जणांना नोटापेक्षा कमी मते मिळतात़ ते पाहावे लागेल़. 
़़़़़़़़़़़
मते दोन प्रमुख उमेदवारांना गेल्या निवडणुकीत मिळाली होती. भाजपचे अनिल शिरोळे यांना ५, ६९, ८२५ तर काँग्रेसचे डॉ़ विश्वजित कदम यांना २,५४,५६मते मिळाली़. 

Web Title: nota option strong against 23 canditate in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.