Kasba By Election: कसबा पोटनिवडणुकीत NOTA तिसऱ्या क्रमांकावर; मतदारांनी का निवडला हा पर्याय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 03:14 PM2023-03-02T15:14:48+5:302023-03-02T15:16:56+5:30
रासनेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर कसब्यात नाराजीच्या चर्चा होत्या
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजयी मुसंडी मारत महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ०४० मतांनी पराभव केला. तब्बल ३० वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यामध्ये धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय झाला. विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ७३ हजार १९४ मते मिळाली. तर हेमंत रासने यांना ६२ हजार २४४ मते मिळाली. त्यानंतर अनेकांनी नोटाचा पर्याय निवडल्याचे दिसून आले आहे. १ हजार ३९७ मतदारांनी नोटा समोरचे बटण दाबून नाराजी व्यक्त केली आहे.
कसबा विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासह ४० स्टार प्रचारक उतरविले होते. मुख्यमंत्री शिंदे हे दोन दिवस पुण्यात ठाण मांडुन बसले होते. उपमुख्यमंत्री फडणवीस हे १० वेळा पुण्यात आले होते. तसेच महाविकास आघाडीकडूनही तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते प्रचारासाठी पुण्यात येत होते. रासनेंना उमेदवारी जाहीर केल्यावर ब्राह्मण उमेदवाराला तिकीट न दिल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे रासनेंच्या प्रभागात आघाडी मिळूनही धंगेकरांना पिछाडीवर टाकण्यास फारशी उपयोगी पडली नाही.
महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी,उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यासह मित्र पक्षांनी एकजुटीने काम केले. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ल्यात पराभव झाला. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्यावर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अत्यंत जोरदार केला.