पुणेकरांनो, सक्तीला विरोध करताना हेल्मेटची उपयुक्तताही लक्षात घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 03:04 PM2019-06-19T15:04:22+5:302019-06-19T15:08:40+5:30

खेडमधील मेदनकरवाडी मधील किरण मेदनकर हे तसे कोणाला माहिती असायचे कारण नाही़. मात्र, गेल्या आठवड्यात त्यांनी आपल्या मुलाबाबत जे घडले तर इतरांच्या घरात घडू नये, यासाठी मुलाच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात नागरिकांना मोफत हेल्मेटचे वाटप केले़. 

note the utility of helmets against opposition from the Pune citizen | पुणेकरांनो, सक्तीला विरोध करताना हेल्मेटची उपयुक्तताही लक्षात घ्या

पुणेकरांनो, सक्तीला विरोध करताना हेल्मेटची उपयुक्तताही लक्षात घ्या

Next

पुणे : विवेक भुसे
खेडमधील मेदनकरवाडी मधील किरण मेदनकर हे तसे कोणाला माहिती असायचे कारण नाही़. मात्र, गेल्या आठवड्यात त्यांनी आपल्या मुलाबाबत जे घडले तर इतरांच्या घरात घडू नये, यासाठी मुलाच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात नागरिकांना मोफत हेल्मेटचे वाटप केले़.  त्यांचा मुलगा दिग्विजय मेदनकर हा २२ वर्षाचा मुलगा पुण्यात इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता़. त्याचा नुकताच दुचाकीवरुन पडून मृत्यु झाला़. गाडी चालविताना दिग्विजय याच्या डोक्यावर हेल्मेट असते, तर त्याचा जीव नक्कीच वाचला असता अशी वेळ कोणावर येऊ नये यासाठी त्यांनी हेल्मेटचे वाटप केले़. 
शहरात दररोज अनेक छोटे मोठे अपघात घडतात़. त्यातून काही दुचाकीस्वारांना आपले प्राण गमवावे लागतात़. आपला जीव वाचविणे हे प्रत्येकाचे व त्यांच्या घरांचे कर्तव्य आहे़. त्यासाठी स्वत:च्या सुरक्षेसाठी दुचाकीस्वाराला हेल्मेट असणे महत्वाचे ठरते़. मात्र, एका बाजूला सक्तीला विरोध करत असताना त्याच्या सकारात्मक बाजूकडे दुर्लक्ष केले जात आहे़. त्याचे दुष्परिणामाविषयी गाजावाजा होतो़. पण त्याच्या सकारात्मक बाजू पुढे पाहिजे तितक्या ठळकपणे पुढे आली नाही़.  त्यामुळे शहरात वाहनांचा स्पीड २० ते ३० किमीपेक्षा जास्त नसतो़.  लहान मुलांना कसे हेल्मेट घालणाऱ हेल्मेट घातल्याने घाम येतो, असे अनेक गैरलागू प्रश्न उपस्थित करुन हेल्मेटविषयी व त्याच्या वापरापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला़. पण त्याचे समर्थन करणारे त्यामानाने कधीच पुढे आले नाही़. 
तिन्ही ऋतुमध्ये हेम्लेट वापरणे कसे चांगले आहे, हे दुचाकीस्वारांना पटवून देण्याचे काम करण्यास कोणीही पुढे आले नाही़. उन्हाळ्यात हेल्मेट वापरल्याने घामाचा धारा  येतात, असे म्हणणारे हे विसरतात की, हेल्मेट घातले तर तोंडाला रुमाल बांधण्याची गरज पडत नाही़ तसेच उन्हाचा तडाखा चेहºयाला बसत नाही़ हिवाळा आणि पावसाळ्यातही हेल्मेटचा फायदा होतो़. 
पुणेपोलिसांनी विना हेल्मेटचालकावर कारवाई करताना त्यात तारतम्य बाळगण्याची थोडी गरज होती़. वाहतूक नियम मोडला म्हणजे आपण काही गुन्हा केला आहे, त्याचे गांभीर्य नागरिकांमध्ये नाही़ त्यामुळे रस्त्यात एखाद्या पोलिसांनी आपल्याला अडविले तर तो त्यांचा अपमान वाटतो़ ही सार्वत्रिक भावना आहे़.त्याचबरोबर वैयक्तिक सुरक्षा याविषयी वाहनचालकांमध्ये अजिबात जागृती नाही़.  त्याचा फायदा घेऊन राजकीय नेते आपण पुणेकरांसाठी काही करत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करतात़. 
अन्य शहरातील परिस्थिती आणि पुणे यांच्यामध्ये दुचाकीबाबत जमीनआस्मानाचा फरक आहे़. हेही तारतम्य पोलिसांनी बाळगले पाहिजे़. त्याचे भान न ठेवल्याने शेवटी मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची वेळ आली़ मात्र, या निर्णयामुळे जे स्वत: हून हेल्मेट वापरत होते़. त्यापैकी अनेक जण हेल्मेट पुन्हा घरी ठेवण्याची शक्यता आहे़. अशांना उद्या कदाचित अपघात झाला व त्यात दुदैवी घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणाऱ आतताईपणे मोहिम राबविणारे पोलीस की हेल्मेटला विरोध करणारे हे नेते?

Web Title: note the utility of helmets against opposition from the Pune citizen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.