डेंग्यूसंदर्भात 1300 नागरिकांना नोटिसा
By admin | Published: November 1, 2014 12:05 AM2014-11-01T00:05:32+5:302014-11-01T00:05:32+5:30
डेंग्यूचा वाढता प्रसार पाहून महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक दोन अंतर्गत कीटक प्रतिबंधात्मक विभागामार्फत 43 हजार 35क् घरांची तपासणी करण्यात आली.
Next
बंडगार्डन : डेंग्यूचा वाढता प्रसार पाहून महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक दोन अंतर्गत कीटक प्रतिबंधात्मक विभागामार्फत 43 हजार 35क् घरांची तपासणी करण्यात आली. 1क् हजार 338 ब्रिडींग ठिकाणी कंटेनर ठेवण्यात आले आहेत. 17 हजार 226 अबेटिंग ठिकाणो नष्ट करण्यात आली आहेत. डेंग्यूसंदर्भात 1,3क्7 नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
सध्या पुणो शहरात ठिकठिकाणी डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून, या आजाराला कसा प्रतिबंध करायचा या संदर्भात महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरांवर प्रय} केले जात आहेत.
आतार्पयत या कार्यालयांतर्गत 44 हजार 35क् रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या परिसरात 8क् हजार 25क् माहितीपत्रके जनहितार्थ वाटण्यात आली असून, 3 हजार 94क् पोस्टर तथा स्टिकर पुरविण्यात आलेली आहेत. परिसरात एकूण 34 घंटागाडय़ांद्वारे डेंग्यूसंदर्भात जनजागृती केली जात आहे. या संदर्भातच पुणो कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार दिलीप कांबळे यांनी कै. बा. स. ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयात अधिका:यांसोबत आढवा बैठक घेतली.
या वेळी विभागीय कार्यालयाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त संदीप ढोले, येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त संध्या गागरे, स्थानिक आरोग्य विभागप्रमुख डॉ. रेखा गलांडे, डॉ. नितीन वीर, डॉ. ज्ञानेश्वर चकोर, डॉ. संदीप धेंडे आदींसह आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. (वार्ताहर)
4डेंग्यू आजारासंदर्भात नागरिकांनी दक्षता घ्यावी, तसेच कुंडी/मनीप्लांटमध्ये पाणी साठू देऊ नये. कुंडीखाली प्लेट ठेवू नये अथवा प्लेटमधील पाणी दररोज बदलावे. फ्रिज व एअर कंडिशनर यांच्यामागील ट्रेमधील पाणी सतत बदलावे. ड्रम, बॅरेल, कॅनला झाकण लावावे. पाणी सतत वाहते ठेवणो. पाणी यामध्ये साठू देऊ नये. भंगार साहित्य टेरेस व इतर परिसरात ठेवू नये. या निरुपयोगी वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साठत असल्याने या वस्तूंची विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ ठेवावा. टेरेस व जमिनीवरील टाकी, हौद, रांजण यांना नेहमी झाकण लावावे, असे आवाहन केल्याचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.