पुणे विभागातील ८८ बेकऱ्यांना नोटीस
By admin | Published: January 4, 2017 05:30 AM2017-01-04T05:30:06+5:302017-01-04T05:30:06+5:30
अन्न व औषध विभागाने सुरक्षेचा विचार करून पुणे विभागातील ८२ बेकऱ्यांना नोटिसा पाठविण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने केली आहे. पुण्यात कोंढव्यातील बेकरीला
पुणे : अन्न व औषध विभागाने सुरक्षेचा विचार करून पुणे विभागातील ८२ बेकऱ्यांना नोटिसा पाठविण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने केली आहे. पुण्यात कोंढव्यातील बेकरीला आग लागल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागातील सर्व बेकऱ्यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली.
यामध्ये पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील बेकऱ्यांची तपासणी मोहीम १ जानेवारीपासून हाती घेण्यात आली. त्या मोहिमेंतर्गत गेल्या तीन दिवसांत ८२ बेकऱ्यांना नोटिसा देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यांपैकी ५४ बेकऱ्या या पुणे जिल्ह्यातील असून, जिल्ह्यातील १३ बेकऱ्याचालक विनापरवाना व्यवसाय करीत असल्याचे आढळले. अनेक बेकऱ्यांमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याचेही निरीक्षण अन्न औषध प्रशासनाने नोंदविले. त्याशिवाय ५४ पैकी १६ बेकऱ्यांमध्ये भट्टी असलेल्या ठिकाणीच कामगार राहत असल्याचे आढळले. त्या बेकऱ्यांना नोटीस देण्यात आली असल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली.
विभागात २० बेकऱ्यांना कामगारांच्या सोयीसुविधेबाबत नोटिसा दिल्या आहेत. कायद्यानुसार बेकरीच्या पदार्थांचे उत्पादन केल्या जात असलेल्या ठिकाणी राहता येत नाही. त्यामुळे कामगारांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे आदेश दिले असल्याचेही देसाई यांनी सांगितले.