ॲक्सिस बँकेला शेतकऱ्याकडून कारवाईची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:11 AM2021-03-23T04:11:52+5:302021-03-23T04:11:52+5:30
शांतीलाल वायाळ (रा. बिरोबावाडी, ता. दौंड) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेची माहिती अशी की, बिरोबावाडी येथील ...
शांतीलाल वायाळ (रा. बिरोबावाडी, ता. दौंड) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेची माहिती अशी की, बिरोबावाडी येथील शांतीलाल यांच्या घरी आॅक्टोबर २०१७ ला ॲक्सिस बँकेचे वाळके नावाचे एक एजंट आले होते. त्यांनी वायाळ यांना ॲक्सिस बँकेच्या शाखेत पाच हजार रुपये भरुन खाते काढण्याचा प्रचंड आग्रह केला. खाते उघडण्याची मनस्थिती नसतानाही त्यांना खाते उघडण्यास भाग पाडले गेले. त्यानंतर वायाळ यांना बॅंकेकडून चेकबुक, ए. टी.एम. कार्ड आदी सेवा पोस्टाने मिळाल्या . याचा कुठेही वापर अथवा व्यवहार केला नाही. कालांतराने वायाळ यांच्या खात्यातून रक्कम कापली जात असल्याचे मेसेज वायाळ यांना बँकेकडून येत गेले. खात्यात कमीत कमी बॅलेन्स न ठेवल्यामुळे बॅलेन्समधून रक्कम कपात होत असल्याचे बॅंकेने सांगितले. त्यामुळे कंटाळून वायाळ यांनी १७ सप्टेंबर२० १९ रोजी रजिष्टर पोष्टाने बँकेला कळवले की खात्यातून विनाकारण पैसे कट होत असल्याने खाते बंद करा. खाते बंद करण्यासाठी दीड वर्ष अगोदर रीतसर लेखी स्वरुपात अर्ज पाठवले असताना खाते बंद केले नाहीच. शिवाय त्यातील शिल्लक रक्कम परत न देता उलट ४३ हजारांचा भरणा करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे अखेर वायाळ यांनी बॅंकेला नोटीस पाठवली.