‘बिग बॉस’च्या चित्रीकरणाला ‘ना हरकत’ परवाना रद्दची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 04:28 AM2017-12-02T04:28:07+5:302017-12-02T04:28:25+5:30
‘बिग बॉस’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी लोणावळा नगर परिषदेने दिलेला ‘ना हरकत’ परवाना रद्द करा, असा अहवाल नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने दिला आहे. यावरून नगर परिषदेने बिग बॉसच्या संचालक कंपनीला अनधिकृत बांधकाम काढून घेण्याबाबत
लोणावळा (जि. पुणे) : ‘बिग बॉस’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी लोणावळा नगर परिषदेने दिलेला ‘ना हरकत’ परवाना रद्द करा, असा अहवाल नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने दिला आहे. यावरून नगर परिषदेने बिग बॉसच्या संचालक कंपनीला अनधिकृत बांधकाम काढून घेण्याबाबत नोटीस बजावली आहे. त्यामुळे ही मालिका अंतिम टप्प्यात आली असताना अडचणीत येण्याची शक्यता आहे.
लोणावळा नगर परिषदेचे नगरसेवक देविदास कडू यांनी ‘बिग बॉस’ला देण्यात आलेला परवाना व बांधकाम याबाबत माहिती मागवली होती.
या अर्जाच्या आधारे नगर परिषदेच्या मिळकत व अतिक्रमण विभागाने या मालिकेचे चित्रीकरण सुरू असलेल्या लोणावळा बाजार भागातील एबीसी बेअरिंग कंपनीच्या आवारात जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी परवानगी नसतानादेखील १३ व्हीआयपी स्वच्छतागृहे बांधल्याचे निदर्शनास आले आहे.
तसेच ‘ना हरकत’ परवाना देताना ज्या अटी व शर्ती घालून देण्यात आल्या होत्या, त्यांपैकी अट क्र. २ व ७चा भंग झाला असल्याचे समोर आले.