सीएनजीची पीएमपीला नोटीस, थकीत रक्कम भरा, अन्यथा पुरवठा बंद करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:11 AM2021-05-21T04:11:46+5:302021-05-21T04:11:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पीएमपीची सुरू असलेली अत्यावश्यक सेवेतील वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली. कारण सीएनजीने पीएमपी ...

Notice to PMP of CNG, pay the outstanding amount, otherwise we will stop supply | सीएनजीची पीएमपीला नोटीस, थकीत रक्कम भरा, अन्यथा पुरवठा बंद करू

सीएनजीची पीएमपीला नोटीस, थकीत रक्कम भरा, अन्यथा पुरवठा बंद करू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पीएमपीची सुरू असलेली अत्यावश्यक सेवेतील वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली. कारण सीएनजीने पीएमपी प्रशासनास थकीत रक्कम लवकर भरा अन्यथा तुमचा पुरवठा बंद करू, अशी नोटीस दिली आहे. संचारबंदीच्या काळात पीएमपीचे अर्थचक्र पूर्णपणे थांबले आहे. त्यातच पिंपरी-चिंचवड महापालिकेने पीएमपीचे देखील देणी थकविले असल्या कारणाने पीएमपीवर ही नामुष्की ओढावली आहे.

संचारबंदीमुळे पीएमपीची सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील घटकांसाठी सुरू आहे. यात केवळ ११८ गाड्या दररोज धावत आहे. यातून मिळणारे उत्पन्न देखील कमी आहे. पुणे महापालिका २० कोटी तर पिपरी- चिंचवड महापालिका १८ कोटी ह्या अत्यावश्यक सेवेच्या बिलापोटी देणे आहे. यात पुणे महापालिकेने २० कोटींची रक्कम पीएमपीला दिली आहे. तर पिंपरी-चिंचवडकडून अद्याप येणे बाकी आहे. ही रक्कम लवकर नाही मिळाली तर सीएनजीचा पुरवठा तर खंडित होईलच. शिवाय मे महिन्यातील पीएमपीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.

बॉक्स

सीएनजीचे ५२ कोटी थकले :

सीएनजीवर पीएमपीचे बहुतांश गाड्या धावतात. पैकी सध्या ११८ गाडया अत्यावश्यक सेवेत धावत आहेत. सीएनजी पुरवठा बदल्यात पीएमपी ५२ कोटी रुपये देणे लागते. ती रक्कम थकल्याने सीएनजीने बुधवारी पीएमपीला नोटीस बजावली आहे. त्यात थकीत रक्कम भरा अन्यथा इंधन पुरवठा बंद करू असे म्हंटले आहे.

कोट :

पीएमपीला सीएनजीची नोटीस मिळाली असून थकीत रक्कम लवकर अदा करावी, असे सांगितले आहे. पीएमपीची आर्थिक स्थिती सध्या नाजूक आहे. पुणे महापालिकेनी आपली रक्कम दिली असून पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून अद्याप येणे बाकी आहे. अशीच स्थिती राहिली तर कर्मचाऱ्यांच्या वेतनावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

डॉ. चेतना केरूरे, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

Web Title: Notice to PMP of CNG, pay the outstanding amount, otherwise we will stop supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.