रस्त्यावर फिरणाऱ्या महापालिकेच्या त्या गाड्यांना ‘आरटीओ’ची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:11 AM2021-02-25T04:11:45+5:302021-02-25T04:11:45+5:30
पुणे : महापालिकेच्या घनकचरा विभागाकडील कचरा गोळा करण्यासाठी रस्त्यांवर फिरणाऱ्या दुरवस्थेतील पाच गाड्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) बुधवारी नोटीस ...
पुणे : महापालिकेच्या घनकचरा विभागाकडील कचरा गोळा करण्यासाठी रस्त्यांवर फिरणाऱ्या दुरवस्थेतील पाच गाड्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) बुधवारी नोटीस बजावली आहे़ तसेच महापालिकेच्या वाहन विभागात किती जुन्या गाड्या आहेत याचा तपशीलही आरटीओने मागविला आहे़
शहरातील कचरा गोळा करण्यासाठी पुणे महापालिकेच्या फिरणा-या गाड्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे़ तसेच वीस-तीस वर्षांपूर्वीच्या शेकडो खराब गाड्या कि ज्यांना नंबर प्लेट, हेडलाईट, साईड मिरर, इंडीकेटर, वायफर आदी इत्यादी अत्यावश्यक सुविधा नाही, अशा गाड्याही बिनधास्तपणे दिवसभर रस्त्यांवर फिरत आहेत़
याची दखल घेत आरटीओ पुणे महापालिकेला पत्र पाठवून महापालिकेकडे पंधरा वर्षांपूर्वीच्या किती गाड्या आहेत़ त्यापैकी प्रत्यक्ष रस्त्यावर किती फिरत आहेत, डेपोमध्ये किती आहेत याचा तपशील मागविला आहे़ याचबरोबर मोठ्या गाड्यांचे म्हणजेच ट्रक, ट्रेलर आदींच्या आरटीओ नियमाप्रमाणे दरवर्षी परवान्यांचे नूतनीकरण करण्याबरोबरच, तत्सम कागदपत्रांची पूर्तता केली आहे की नाही याचाही तपशील मागविण्यात आला आहे, अशी माहिती पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़
---
चौकट
‘पुणे महापालिकेच्या पाचशेहून अधिक गाड्या निघणार भंगारात’ हे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते़ याची दखल घेत पुणे आरटीआकडून दुरवस्थेत असलेल्या महापालिकेच्या ज्या गाड्या रस्त्यावर धावताना दिसतील त्यांच्यावर लागलीच कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. बुधवारी याची सुरुवात झाली असून, पाच गाड्यांना प्रारंभी नोटीस देण्यात आली आहे़
---
फोटो मेल केला आहे़