ससून, सहकार आयुक्त कार्यालयास नोटीस

By admin | Published: November 2, 2014 12:05 AM2014-11-02T00:05:06+5:302014-11-02T00:05:06+5:30

शहरासह जिल्ह्यात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असून, ससून रुग्णालयामध्ये दररोज या आजाराच्या शेकडो रुग्णांच्या रांगा लागत आहेत.

Notice to the Sadus Commissioner Office | ससून, सहकार आयुक्त कार्यालयास नोटीस

ससून, सहकार आयुक्त कार्यालयास नोटीस

Next
पुणो : शहरासह जिल्ह्यात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असून, ससून रुग्णालयामध्ये दररोज या आजाराच्या शेकडो रुग्णांच्या रांगा लागत आहेत. या रुग्णांची तपासणी करणा:या डॉक्टरांच्या क्वार्टर्समध्येच चक्क डेंग्यूच्या डासांची पैदास आढळून आली आहे. ही बाब गंभीर असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने याला जबाबदार म्हणून ससूनचे डॉक्टर विष्णू सदाशिव यांना नोटीस बजावली आहे. या क्वार्टर्सच्या परिसरातील सिंटेक्सच्या पाण्याच्या टाकीत ही डासांची पैदास आढळून आली आहे. याशिवाय ससूनच्या समोरील बाजूस असलेल्या मध्यवर्ती इमारतीमधील (सेंट्रल बिल्डिंग) सहकार आयुक्तांच्या कार्यालयातील पाण्याच्या कूलरमध्येही डेंग्यूच्या डासांची पैदास आढळून आली असून, या कार्यालयासही महापालिकेने नोटीस बजावली आहे. अशाप्रकारे शासकीय कार्यालयांना नोटीस बजाविण्याची ही पहिलीच वेळ आहे.
   गेल्या चार महिन्यांत शहरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. जानेवारीपासून आज अखेर्पयत शहरात तब्बल 3 हजार 43 डेंग्यूची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत, तर महापालिकेकडून या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी शहरात विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी, दिवसेंदिवस या आजाराचे रुग्ण वाढतच आहेत. त्यामुळे महापालिकेने गेल्या दोन दिवसांपासून शहरात ‘मिशन फाईव्ह डे’ ही मोहीम हाती घेतली असून, त्या अंतर्गत शहरातील सर्व मिळकतींची तपासणी करण्यात येत आहे. 
या तपासणीत वरील दोन्ही ठिकाणी केलेल्या तपासणीत या दोन्ही ठिकाणी डासांची पैदास आढळून आल्याचे महापालिकेचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ.एस.टी परदेशी यांनी सांगितले. ही पैदास ठिकाणो नष्ट करण्यात आली असून, या दोन्ही कार्यालयांना नोटिसा बजाविण्यात आल्या असल्याचे ते म्हणाले. 
 
डेंग्यूची  सद्यस्थिती 
जानेवारी ते ऑक्टोबर 
रुग्णांची संख्या - 3क्43 
आज लागण झालेल्या 
रुग्णांची संख्या- 21
वर्षभरात डेंग्यूने झालेले मृत्यू - 6
महापालिकेने बजाविलेल्या  नोटिसा - 5 हजार 
डासोत्पत्ती आढळल्याने 
केलेला दंड- 2 लाख 85 हजार 
शहरातील घरांची 
तपासणी - 9 लाख 
हेल्पलाईनवरील तक्रारी - 773
 
डेंग्यूच्या नावाखालील फसवणुकीला लगाम
पुणो : गेल्या चार महिन्यांत शहरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. त्यामुळे या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच असल्याने शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र, या आजाराच्या नावाखाली रुग्णांची हजारो रुपयांची फसवणूक केली जात असल्याने या प्रकाराला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासन सरसावले आहे. त्यासाठी येत्या सोमवारपासून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात  येणार असून, त्यांच्या उपचाराच्या दरांची माहिती घेण्यात येणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. 
गेल्या चार महिन्यांपासून शहरात डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. हा आकडा तीन हजारांच्या वर गेला असून, आतार्पयत सहा जणांचे बळी गेले आहेत. दिवसें दिवस या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे धास्तावलेल्या नागरिकांकडून आजारच्या भीतीने खासगी रुग्णालयांची वाट धरली जात आहे. मात्र, शहरातील काही रुग्णालये याचा गैरफायदा घेत असून, डेंग्यूच्या नावाखाली रुग्णांकडून मनमानी बिले आकारली जात आहेत. 
तसेच डेंग्यूच्या रक्त तपासणीसाठीही मोठय़ा प्रमाणात बिले आकारली जात आहेत. त्याबाबत अनेक नागरिक, नगरसेवक व शहरातील स्वयंसेवकांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. 
तसेच या  आजाराच्या रुग्णांच्या तपासण्या महापालिकेने मोफत करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, महापालिकेने या तपासण्या आणि उपचार सुरू केले आहेत. (प्रतिनिधी)
 

 

Web Title: Notice to the Sadus Commissioner Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.