Monkeypox: मंकीपाॅक्सबाबत पुण्यातील नायडू हाॅस्पिटलला सूचना; संशयित रुग्ण आढळल्यास...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 09:54 PM2022-05-23T21:54:41+5:302022-05-23T21:54:51+5:30

नायडू हे महापालिकेचे संसर्गजन्य राेगांच्या रुग्णांवर उपचार करणारे हाॅस्पिटल

Notice to Naidu Hospital in Pune regarding monkey pox If a suspicious patient is found ... | Monkeypox: मंकीपाॅक्सबाबत पुण्यातील नायडू हाॅस्पिटलला सूचना; संशयित रुग्ण आढळल्यास...

Monkeypox: मंकीपाॅक्सबाबत पुण्यातील नायडू हाॅस्पिटलला सूचना; संशयित रुग्ण आढळल्यास...

Next

पुणे : मंकीपाॅक्स या आजाराबाबत पुणे महापालिका आराेग्य खात्याने नायडू हाॅस्पिटल प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. संशयित रुग्ण आढळल्यास त्याबाबत माहिती घ्या, असे सांगण्यात आले आहे. तसेच अद्याप आपल्याकडे असा संशयित रुग्ण आढळून आलेला नाही.

नायडू हे महापालिकेचे संसर्गजन्य राेगांच्या रुग्णांवर उपचार करणारे हाॅस्पिटल आहे. स्वाइन फ्लूपासून काेराेनापर्यंतचे सर्व रुग्ण येथेच प्रथम दखल करण्यात आले. कारण येथे विलगीकरण कक्षदेखील आहे. राज्याच्या साथराेग विभागाला राष्ट्रीय राेग निवारण केंद्राकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार राज्याने सर्व जिल्ह्यांना आणि महापालिका यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनांनुसार ज्या देशांत मंकीपाॅक्सचा प्रादुर्भाव झाला आहे तेथून आपल्याकडे प्रवास करून आलेल्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलेले आहे.

हे प्रवासी गेल्या २१ दिवसांमध्ये जर प्रादुर्भावग्रस्त देशांत जाऊन आले असतील आणि त्यांना ताप, अंगावर पुरळ येणे असे मंकीपाॅक्सचे संशयित लक्षणे असतील तर त्यांना विलगीकरण करून त्यांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सूचना प्राप्त झाल्यावर पुणे महापालिकेनेदेखील खबरदारी घेतली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पुणे महापालिकेचे सहायक साथराेग अधिकारी डाॅ. संजीव वावरे म्हणाले की, याबाबत नायडू रुग्णालयाला सूचना देण्यात आल्या आहेत. जर असे रुग्ण आढळलेच तर त्यांच्यावर नायडू रुग्णालयात उपचार करण्यात येतील. तशी साेयदेखील तेथे उपलब्ध आहे.

मंकीपाॅक्स सद्यस्थिती

- आतापर्यंत ११ देशांत ९२ रुग्ण आढळलेले आहेत.
- मंकीपाॅक्स हा प्राण्यांपासून मानवामध्ये पसरलेला एक विषाणू आहे.
- ताे प्राण्यांपासून माणसांत किंवा माणसापासून माणसात पसरू शकताे.
- त्वचेद्वारे किंवा श्वासाेच्छ्वासाद्वारे त्याचा प्रसार हाेताे.
- यामध्ये ताप येणे, अंगावर पुरळ येणे आणि लिंफनाेडला सूज येते.
- ही लक्षणे २ ते ४ आठवड्यांपर्यंत राहतात.

Web Title: Notice to Naidu Hospital in Pune regarding monkey pox If a suspicious patient is found ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.