पुणे शहरातील बोगस दस्त नोंदणी मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांना नोटीसा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 07:25 PM2022-04-05T19:25:18+5:302022-04-05T19:25:42+5:30
वरिष्ठ लिपिकांवर निलंबनाची कारवाई...
पुणे : शासनाने कायद्याने बंदी घातल्यानंतर व गुंठेवारीची दस्त नोंदणी केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देऊनही एकट्या पुणे शहरात तब्बल 44 दुय्यम व कर्मचारी यांनी संगनमताने 10 हजार 561 बोगस, गुंठेवारीचे दस्त नोंदणी केल्याचे समोर आले. या प्रकरणात मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखी, गोपीनाथ कोळेकर व प्रवीण देशपांडे यांना नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने कारणे दाखवा नोटीसा दिल्या आहेत. दरम्यान पुणे शहरातील 27 पैकी 11 दुय्यम निबंधक व दुय्यम निबंधक पदाचा कार्यभार असलेल्या वरिष्ठ लिपिकांचे निलंबन करून घरी पाठवले आहे.
राज्य शासनाने 400 पेक्षा अधिक गुंठेवारीचे व रेरा कायद्याचे उल्लंघन करून दस्त नोंदणी करणा-या दुय्यम निबंधकांना त्वरीत निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात गेले अनेक वर्षांपासून हे दुय्यम निबंधक अशा प्रकारे बोगस दस्त नोंदणी करत असल्याचे समोर आले आहे. यामुळेच शासनाचा कोट्यवधी रुपयांचा तोडा झाला असताना, सर्वसामान्य लोकांची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची माया कमवणा-या दुय्यम निबंधकांवर प्रथमच कारवाई करण्यात आली आहे.
पुणे शहरातील कारवाई झालेले त्यांनी केलेले बोगस दस्तांची संख्या कंसात
निलंबित दुय्यम निबंधक व पदाभार असलेले वरिष्ठ लिपिक
- ए.एन.फडतरे (1286), ए.के.नंदकर (466), पी.आर.भोई (413), एल.ए.भोसले (810), एस.एस.कुलकर्णी (804), आर.ओ.मेहेन (741), ए.व्ही.तारू (613), ए.एम.गायकवाड (595), के.एस.साळुंखे (518), शरद खटके (477), ए.जे.बडघे (467)
बदली करण्यात आलेले अधिकारी
बी.एस.जाधव (342), एस.आर.चव्हाण (338), पी.यु.खटावकर (281), आर.बी.थोरात (372), एस.सी.जाधव (272), ए.पी.सोनटक्के (178), एम.एम.पानसे (109), एस.आर.मेमाणे (106), ए.डी.लाडके(106)
विभागीय चौकशी सुरू
- एम.एस.महाबरे (13), एम.ए.देशमुख (90) एस.एस.गबाले (83), एम.ज.कारंडे (73), स.चं.बुरसे (66), एल.एम.संगावार (65), एस.ए.मेथगे (51), अमित राऊत (33), संतोष जाधव (22)
खुलासा करा नोटीस पाठवली
- द सोनवणे (9), एन.बी.गिरी (7), सी.आर.मोरे (6), टी एस.काटे(10), एस.आर.परदेशी (8), एस.एस.सांगडे (4)
कनिष्ठ लिपीक कारवाई
धम्मपाल मेश्राम (656) निलंबित,
विभागीय चौकशी
काळपांडे राजेश (40) , आचार्य बी.टी (14), भोसले एम.ए (11),
खुलासा करा
बनकर अमृत (6), क्षीरसागर बी.व्ही (4), मेंगाणे एस.एन(1), घोडके राहुल (1), बाराथे सुनिल (1)