‘हर हर महादेव'च्या लेखक, दिग्दर्शक, निर्मात्यांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 09:23 AM2022-11-08T09:23:01+5:302022-11-08T09:24:31+5:30

चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक अभिजित देशपांडे आणि निर्माते यांना कायदेशीर नोटीस...

Notice to writers, directors, producers of 'Har Har Mahadev' | ‘हर हर महादेव'च्या लेखक, दिग्दर्शक, निर्मात्यांना नोटीस

‘हर हर महादेव'च्या लेखक, दिग्दर्शक, निर्मात्यांना नोटीस

googlenewsNext

पुणे : ‘हर हर महादेव’ या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने ऐतिहासिक प्रसंग दाखविले आहेत. त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण होत आहे. शिवाजी महाराजांसोबत लढणाऱ्या बांदल सरदारांचे वंशज, पासलकरांचे वंशज व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक अभिजित देशपांडे आणि निर्माते यांना कायदेशीर नोटीस पाठवून, चित्रपटात दाखविलेल्या प्रसंगाचा ७ दिवसांच्या आत पुराव्यासह लेखी खुलासा करावा, अशी मागणी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची प्रेरणा आणि अस्मिता आहेत. चित्रपटविषयक स्वातंत्र्याच्या नावाखाली इतिहासाचे अशाप्रकारचे विकृतीकरण कसल्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. योग्य व समाधानकारक खुलासा न आल्यास या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते यांच्याविरुद्ध न्यायालयात दाद मागणार आहोत, अशी माहिती ॲड. विकास शिंदे यांनी दिली आहे.

Web Title: Notice to writers, directors, producers of 'Har Har Mahadev'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.