दौंडच्या ६ व्यक्तींना तडीपारीच्या नोटिसा
By Admin | Published: October 13, 2014 12:29 AM2014-10-13T00:29:42+5:302014-10-13T00:29:42+5:30
तालुक्यातील ६ व्यक्तींना तडीपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांनी दिली.
दौंड : तालुक्यातील ६ व्यक्तींना तडीपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांनी दिली. दौंड नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक राजू बारवकर, गणेश वैरागे (खामगाव फाटा), सुहास ठोंबरे (कासुर्डी), बापू ठोंबरे (कासुर्डी), धनंजय झुरुंगे (बोरीऐंदी), अशोक एडके (खामगाव फाटा) यांचा समावेश आहे. त्यांना आपले स्पष्टीकरण देण्यासाठी बुधवार (दि. १२ नोव्हेंबर) रोजी सकाळी ११ वाजता सासवड येथील प्रांत कार्यालय येथे उपस्थित राहावे, असे नमूद केले.
वरील ६ व्यक्तींनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत, त्यामुळे सार्वजनिक शांतता, मालमत्ता व लोकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, तुम्ही पुन्हा गुन्हे करण्याची शक्यता आहे तेव्हा तुम्हाला पुणे शहर, पुणे ग्रामीण, सोलापूर, सातारा, अहमदनगर या पाच जिल्ह्यांतून ३ वर्षांसाठी हद्दपार करावे, असे ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षकांनी कळविले आहे, असे नोटीसीत म्हटले आले आहे.