तीन वर्षांपासून फरार कुख्यात दरोडेखोर बाळू पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:13 AM2021-08-26T04:13:35+5:302021-08-26T04:13:35+5:30
पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी नारायणगाव : आळेफाटा आणि शिरूर पोलीस ठाण्यामध्ये ...
पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
नारायणगाव : आळेफाटा आणि शिरूर पोलीस ठाण्यामध्ये मोक्कांतर्गत दाखल झालेल्या दोन गुन्ह्यांत गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेला कुख्यात दरोडेखोर बाळू उर्फ बाळ्या झारू भोसले याला अटक करण्यात पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिली.
बाळू उर्फ बाळ्या झारू भोसले (वय ४५ रा. निघोज, जि. अ.नगर) हा तीन वर्षांपासून फरार होता. या गुन्ह्यातील फरार आरोपींना लवकरात लवकर पकडण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होते. मात्र, तो जंगल व डोंगराळ भागात राहत असल्याने तो सहजासहजी मिळत नव्हता. स्थानिक गुन्हे शाखेला फरार आरोपीचा शोध घेत असताना पथकाला बाळू उर्फ बाळ्या झारू भोसले हा वेष बदलून राहत असल्याची गोपनीय माहिती बातमीदारामार्फत मिळाली. बाळू हा बेल्हे येथे अळकुटी फाट्यावर येणार आहे, असे समजताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून सिनेस्टाईल पाटलाग करीत बाळू यास ताब्यात घेऊन आळेफाटा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली नेताजी गंधारे, दीपक साबळे, हनुमंत पासलकर, विक्रम तापकीर, संदीप वारे, अक्षय नवले, नीलेश सुपेकर, दगडू वीरकर यांनी ही कारवाई केली आहे.
250821\img-20210824-wa0346.jpg
मोक्का अंतर्गत आळेफाटा आणि शिरूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या दोन गुन्ह्यात गेली तीन वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात दरोडेखोर बाळू उर्फ बाळ्या झारु भोसले यास ताब्यात घेणारे पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक .