अाता खुर्चीत बसून ग्रह ताऱ्यांची सफर करता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 07:00 PM2018-05-02T19:00:03+5:302018-05-02T19:00:03+5:30
थ्री डी तारांगणाच्या माध्यमातून ग्रह-ताऱ्यांची माहिती मिळवणे अाता शक्य हाेणार आहे. पुण्यात थ्री डी व्हिज्युलायझेशन डिजिटल तंत्रज्ञानावर अाधारित तारांगण उभारण्यात अाले अाहे.
पुणे : तुमच्या बाजूने एखादा ग्रह जाताेय. तुम्ही थेट चंद्रावर उभे अाहात. किंवा हजाराे फूट उंचीवरुन तुम्ही पृथ्वीवर उडी मारली तर...या सगळ्यांचा अनुभव अाता तुम्हाला एका जागी बसून घेता येणार अाहे. भारतातील पहिले थ्री डी तारांगण पुण्यात उभारण्यात अाले असून या माध्यमातून ग्रह-ताऱ्यांची माहिती थ्री डी माध्यमातून जाणून घेता येणार अाहे. नगरसेवक अाबा बागुल यांच्या संकल्पनेतुन या तारांगणाची उभारणी करण्यात अाली अाहे. सहकारनगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये अत्याधुनिक थ्री डी व्हिज्युलायझेशन डिजिटल तंत्रज्ञानावर अाधारित हे तारांगण असून याला विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात अाले अाहे. थ्री डी तारांगण हा पुणे महानगरपालिकेचा देशातील पहिला प्रकल्प अाहे. 1 मे राेजी या तारांगणाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात अाले.
या थ्री डी तारांगणाच्या माध्यमातून ग्रह ताऱ्यांची माहिती मिळवणे शक्य हाेणार अाहे. त्याचबराेबर या तारांगणत बसल्यावर अापण स्वतः अवकाशातच अाहाेत अशीच अनुभूती येत राहते. या तारांगणामुळे पुण्याच्या वैभवाता अाणखी एक भर पडली असून, विद्यार्थ्यांना याचा माेठा फायदा हाेणार अाहे. अनेकदा अवकाशात असलेल्या ग्रहताऱ्यांची रचना, त्यात घडणाऱ्या ग्रहणांसारख्या घटना याबाबत सर्वसामान्यांना माेठे कुतूहल असते. मात्र प्रत्यक्षात त्याबाबत त्राेटक माहिती उपलब्ध हाेते. ही माहिती दृकश्राव्य माध्यामातून प्रभावीपणे जिज्ञासूंसमाेर अाता या तारांगणाच्या माध्यमातून मांडता येणार अाहे. या तारांगणाचा डाेम व्यास सुमारे 9.50 मीटरचा अाहे. एफ. अार. पी मध्ये हा तयार करण्यात अाला असून 15 अंशात पुढील बाजूस डाेम बसविल्याने प्रेक्षकांना प्रत्यक्ष खगाेल विश्वात असल्याची अनुभूती मिळते. अवकाशातील रचना अाणि घडामाेडी यांचे प्रभावी दर्शन घडविण्यासाठी या तारांगणात अत्याधुनिक 4 के रेझ्युलेशनचे 3 व्हिज्युलायझेशन डिजीटल तंत्रज्ञानाचा अाणि 10.1 क्षमतेच्या ध्वनी यंत्रणेचा वापर करण्यात अाला अाहे. एकावेळी 52 लाेक बसू शकतील इतकी या तारांगणाची अासन क्षमता असून खुर्च्या अावश्यक त्या काेनात पुढे-मागे हाेतात. तसेच या खुर्च्या स्लीपिंग चेअर पद्धतीच्या अाहेत. सध्या या तारांगणात ग्रह ताऱ्यांची माहिती देणाऱ्या इंग्रजीतील 20 फिल्मस उपलब्ध असून लवकरच मराठी तसेच हिंदी माध्यमातूनही फिल्मस दाखवणे शक्य हाेणार आहे.