आता प्रत्येक कैद्यांसाठी आधार कार्ड; कैद्यांसाठी विशेष शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:13 AM2021-09-07T04:13:25+5:302021-09-07T04:13:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शासनाच्या वतीने कैद्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात, पण केवळ आधार कार्ड नसल्याने लाभ घेता ...

Now Aadhar card for every prisoner; Special camp for prisoners | आता प्रत्येक कैद्यांसाठी आधार कार्ड; कैद्यांसाठी विशेष शिबिर

आता प्रत्येक कैद्यांसाठी आधार कार्ड; कैद्यांसाठी विशेष शिबिर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शासनाच्या वतीने कैद्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात, पण केवळ आधार कार्ड नसल्याने लाभ घेता येत नाही. यामुळेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने कैद्यांना आधार कार्ड वाटप करण्यासाठी चार दिवसांचे स्वतंत्र शिबिर घेण्यात आले आहे.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सूचनेनुसार समाजातील वंचित घटकांसाठी येरवडा आधार कार्ड शिबिर आयोजित करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मध्यवर्ती कारागृहात बंदिजनांसाठी चार दिवसीय आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकही बंदिजन आधारकार्डशिवाय वंचित राहू नये असे उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे सांगितले.

यावेळी कारागृह अधीक्षक यू. टी. पवार, कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त अनुपमा पवार, अतिरिक्त अधीक्षक राणी भोसले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी जी. के. भोसले, नितीन क्षीरसागर, सोमनाथ म्हस्के, सुभेदार प्रकाश सातपुते, शिक्षक अंगत गव्हाणे उपस्थित होते.

आखाडे म्हणाल्या, समाजातील एकही वंचित घटक आधार कार्ड पासून वंचित राहू नये यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात येरवडा मध्यवर्ती कारागृहातून करण्यात आली आहे. आधारकार्डचा उपयोग शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून लसीकरणासाठी सुध्दा होत आहे. या आधार कार्ड शिबिरात सहभागी होऊन सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही उपजिल्हाधिकारी आखाडे यांनी केले.

-----

Web Title: Now Aadhar card for every prisoner; Special camp for prisoners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.