बारामती परिमंडलात आता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:08 AM2021-06-30T04:08:58+5:302021-06-30T04:08:58+5:30

१२ रोहित्रांवर उपक्रम १२ रोहित्रांवर उपक्रम बारामती : रोहित्र जळाल्यावर त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणारे सर्वत्र सापडतील. मात्र आपणास शिरुर ...

Now in the Baramati circle | बारामती परिमंडलात आता

बारामती परिमंडलात आता

googlenewsNext

१२ रोहित्रांवर उपक्रम

१२ रोहित्रांवर उपक्रम

बारामती : रोहित्र जळाल्यावर त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणारे सर्वत्र सापडतील. मात्र आपणास शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे शेतकऱ्यांनी रोहित्र जळूच नये म्हणून उपक्रम हाती घेतला आहे. येथील महावितरणच्या एका शाखा अभियंत्याने पुढाकार घेत शेतकऱ्यांना रोहित्राप्रती जागरूक करत माझे रोहित्र, माझी जबाबदारी हा उपक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमात भाग घेणारे शेतकरी मंजूर भारानुसार पंप वापरतात. गरज पडल्यास तो अधिकृतपणे वाढवून घेतात. वीजबिल भरून व वीजचोरी टाळून आपली जबाबदारी पार पाडत कपॅसिटरला प्राधान्य देतात. परिणामी रोहित्र जळण्याच्या कटकटीपासून त्यांची सुटका झाली आहे. मांडवगण भागातील १२ रोहित्रांवर हा उपक्रम प्रायोगिकपणे सुरू असून, लवकरच त्याची व्याप्ती वाढणार आहे.

मांडवगण फराटा शाखेचे सहायक अभियंता मतीन मुलाणी यांच्या कार्यक्षेत्रात हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविला जात आहे. शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहता लवकरच हा उपक्रम संपूर्ण परिमंडलात राबविण्याचा मनोदय महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी व्यक्त केला आहे.

——————————————————

उपक्रमाचे सत्रूप : रोहित्र नादुरुस्त होण्याची कारणे शोधली असता; वीजचोरी, मंजूरभारानुसार वापर नसणे, कपॅसिटर नसणे ही प्रमुख कारणे सापडली. तर वारंवार समस्या येत असल्याने वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेही ध्यानात आले. म्हणून उपक्रमासाठी वारंवार जळणाऱ्या रोहित्राची निवड केली. सर्व शेतकऱ्यांचे त्या रोहित्रावर ऑनलाईन मॅपिंग करण्यात आले. शेतकऱ्यांच्या वीजपेटीवर नाव, ग्राहक क्रमांक व मंजूर भार ठळकपणे लिहिण्यात आला. ज्यांचा भार कमी होता तो अधिकृतपणे वाढवून दिला. वीजचोरी करणाऱ्यांना नवीन कनेक्शन घेण्यास भाग पाडले. रोहित्रावरील एका शेतकऱ्यांची रोहित्रप्रमुख म्हणून निवड केली. त्याचे नाव रोहित्राच्या वितरण पेटीवर टाकण्यात आले. सर्वांना कृषी योजनेचा लाभ घेत वीजबिल भरण्यासाठी प्रवृत करण्यात आले.

................................................

समस्या एका दिवसात निकाली

आमचा डीपी वारंवार जळत असल्याने आम्ही पूर्वी फार त्रस्त होतो. आता माझे रोहित्र, माझी जबाबदारी उपक्रमात सहभागी झाल्यामुळे आमच्या डीपीवरील सर्व आकडे काढून त्यांना नवीन कनेक्शन दिले आहेत. वाकलेले खांब सरळ करुन तारांचे झोळ काढले आहेत. डीपीवरील सर्व समस्या एका दिवसात निकाली निघाल्या. माझ्या रोहित्रावर आता कसलीही थकबाकी नाही. भविष्यात ती होऊ न देण्याची आमची जबाबदारी आहे.

महेंद्र काशिद,

बोत्रे डीपी प्रमुख, मांडवगण

———————————————

ऑफिसला जायची गरज पडली नाही

नव्या उपक्रमात आमच्या डीपीचा समावेश महावितरणने केल्याने आम्ही आनंदी आहोत. आम्ही बिले भरताच आमच्या सर्व समस्या निकाली काढल्या. त्यासाठी कुठल्या ऑफिसला जाऊन अर्ज करण्याची व कुणाला भेटण्याची गरज आम्हाला पडली नाही. वीज कंपनीचे आभार.

सुरेश परदेशी,

शेतकरी तथा परदेशी डीपी प्रमुख, मांडवगण

——————————————————

फोटो ओळी :मांडवगण फराटा येथ रोहित्र जळूच नये म्हणून उपक्रम हाती घेतला आहे.

२९०६२०२१-बारामती-२१

————————————————

Web Title: Now in the Baramati circle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.