आता भाजपाचे सरकार आणा
By admin | Published: September 19, 2014 02:24 AM2014-09-19T02:24:22+5:302014-09-19T02:24:22+5:30
देश काँग्रेसमुक्त केला आता राज्याला काँग्रेसमुक्त करुन भाजपाचे सरकार आणा, असे आवाहन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी येथे कार्यकत्र्याना केले.
Next
चौंडी (जि.अहमदनगर) : पूर्वी महाराष्ट्रातील नेत्यांचे दिल्लीत वजन होते. कारण तेव्हा हे राज्य सवरेत्तम होते. पण गेल्या 15 वर्षात शेतक:यांच्या आत्महत्या, वीज भारनियमन आदींमुळे या राज्याची रया गेली. राज्यातील सत्ताधा:यांनी जनतेला लुटले. देश काँग्रेसमुक्त केला आता राज्याला काँग्रेसमुक्त करुन भाजपाचे सरकार आणा, असे आवाहन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी येथे कार्यकत्र्याना केले.
आ. पंकजा मुंडे-पालवे यांच्या नेतृत्त्वातील ‘पुन्हा संघर्ष यात्रे’चा समारोप पुण्योक अहिल्यादेवींची जन्मभूमी चौंडीत झाला. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष आ.देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विनोद तावडे, श्याम जाजू, महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया राहाटकर, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा स्मिता वाघ आदी होते.
स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न आता आपण पूर्ण करु, अशी भावनिक साद घालतानाच ‘राज्यात भाजपाचे सरकार येणार आहे’, असा विश्वास व्यक्त केला़ तर अजित पवार म्हणतात, आता माझी सटकली. जनतेने तुम्हाला 5 हजारांवर दिवस दिले, एवढे दिवस काय केले, असा सवाल करत ‘अजित पवार, आली रे आली आता तुझी बारी आली’ असे आव्हान तावडे यांनी अजित पवारांना दिल़े (प्रतिनिधी)
..तर स्व. मुंडेच मुख्यमंत्री असते
भाषणाच्या प्रारंभालाच अमित शहा यांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. ते म्हणाले, गोपीनाथराव असते तर आज त्यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढविली असती. तेच या राज्याचे मुख्यमंत्री झाले असते.
शरद पवारांनी केले
राजकारणाचे व्यापारीकरण
कोल्हापूर : एकेकाळी देशाला नेतृत्व देणा:या तसेच नैतिकता आणि विकासाच्या ुबाबतीत आदर्श निर्माण करणा:या महाराष्ट्रात शरद पवार यांनी राजकारणाचे व्यापारीकरण केले, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे केला. राज्यातील कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने केलेल्या घोटाळ्याची नि:पक्ष चौकशी झाली, तर त्यांचा एकही नेता जेल बाहेर राहणार नाही, असे शहा म्हणाले. प्रचाराचा शुभारंभ करण्यापूर्वी शहा हे महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात आले होत. विमानतळावर स्वागतासाठी जमलेल्या कार्यकत्र्याना त्यांनी मार्गदर्शन केले.