उजनीच्या पाण्यासाठी आता न्यायालयीन लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:09 AM2021-05-28T04:09:41+5:302021-05-28T04:09:41+5:30
ढोले म्हणाले की, शासनाच्या सर्व निकषांनुसार पुण्यातून येणारे पाच टीएमसी उजनी धरणातील सांडपाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा निर्णय झालेला होता. ...
ढोले म्हणाले की, शासनाच्या सर्व निकषांनुसार पुण्यातून येणारे पाच टीएमसी उजनी धरणातील सांडपाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा निर्णय झालेला होता. कित्येक वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी झगडत आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील काही बोटावर मोजण्याइतक्या लोकांनी विरोध दर्शवून इंदापूर तालुक्याचे हक्काच्या पाण्यावर गदा आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. असे असले तरीदेखील तालुक्यातील शेतकऱ्यांचे व कृती समितीची मागणी अत्यंत नियमानुसार असल्यामुळे न्यायदेवता चांगला निर्णय देईल. न्यायदेवतेवर विश्वास असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाच टीएमसी पाणी मिळणार यामध्ये तिळमात्र शंका नाही.
कृती समितीच्या माध्यमातून न्यायालयीन लढा सनदशीर मार्गाने लढला जाईल. त्यामुळे कोणतेही शेतकऱ्याने घाबरण्याचे कारण नाही. सरकारदेखील शेतीच्या पाण्याचा महत्त्वाचा विषय असल्यामुळे इंदापूर तालुक्याला पाणी देण्यासाठी सकारात्मक विचार पुन्हा करेल. यासाठी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. याचा सर्व शेतकऱ्यांना सार्थ अभिमान आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्याला बेकायदेशीर उजनी धरणातील एक थेंबदेखील पाणी शेतकरी कृती समिती जाऊ देणार नाही, असा इशारा श्रीमंत ढोले यांनी दिला आहे.