आता जिल्हा प्रशासन घेणार ज्येष्ठ नागरिकांची काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:09 AM2021-07-22T04:09:09+5:302021-07-22T04:09:09+5:30
पुणे : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी राष्ट्रीय समाज रक्षा संस्था आणि जनसेवा फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ...
पुणे : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी राष्ट्रीय समाज रक्षा संस्था आणि जनसेवा फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १४५६७ सुरु करण्यात आला आहे. जिल्हयातील ज्येष्ठ नागरिकांनी गरज भासल्यास अथवा जिल्हयातील नागरिकांना कोणतीही वृध्द व्यक्ती बेघर असल्याचे आढळल्यास त्यांना वेळेत मदत मिळावी या करिता तसेच ज्येष्ठ नागरिकांना काही करावयाची असल्यास सदर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी हा ‘टोल फ्री’ क्रमांक प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने दर्शनी भागात लावण्यात यावा व ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त माहिती होण्यासाठी त्याची सार्वजनिक ठिकाणीही प्रसिध्दी करावी अशी सूचना केली आहे.