आता रविवारपासून पीएमपीतही क्यूआर काेड स्कॅन करून काढा तिकीट; पालकमंत्र्यांच्या हस्ते हाेणार उद्घाटन

By अजित घस्ते | Published: September 30, 2023 08:19 PM2023-09-30T20:19:06+5:302023-09-30T20:20:54+5:30

कोथरूड आगारात दुपारी १२ वाजता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ई-तिकीट कॅशलेस पेमेंट सुविधा सुरू करण्यात येणार आहे, असे महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

Now from Sunday, scan the QR card and get the ticket at PMP too; The inauguration will be done by the guardian minister chandrakant patil | आता रविवारपासून पीएमपीतही क्यूआर काेड स्कॅन करून काढा तिकीट; पालकमंत्र्यांच्या हस्ते हाेणार उद्घाटन

आता रविवारपासून पीएमपीतही क्यूआर काेड स्कॅन करून काढा तिकीट; पालकमंत्र्यांच्या हस्ते हाेणार उद्घाटन

googlenewsNext

पुणे : प्रवाशांना तिकिटासाठी क्यू-आर कोडद्वारे ऑनलाइन पेमेंट करता यावे अशी प्रवाशांची अनेक दिवसांपासून मागणी होती. अखेर ऑनलाइन पेमेंटला पीएमपीकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. रविवार (दि. १) पासून ई -तिकीट कॅशलेस पेमेंट सुविधा सुरू करण्यात येणार आहे. कोथरूड आगारात दुपारी १२ वाजता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ई-तिकीट कॅशलेस पेमेंट सुविधा सुरू करण्यात येणार आहे, असे महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

वाहकाच्या ई-तिकीट मशीनमध्ये तिकीट रकमेचा क्यू-आर कोड स्कॅन करून यूपीआयद्वारे पेमेंट करता येणार आहे. त्याच बरोबर कॅशलेस पेमेंट सुविधेमुळे ज्या जुन्या सुविधा चालू आहेत त्यावर कोणताही परिणाम होणार नाही असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

महामंडळामध्ये २०१५ पासून ई-तिकीट मशीनमधून तिकीट प्रणाली सुरू करण्यात आलेली होती; परंतु डिजिटल पेमेंट सुविधा प्रवाशांकरिता सुरू करणे प्रलंबित होते. अखेर प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार पीएमपी प्रशासनाकडून ई-तिकीट मशीनमधून डिजिटल पेमेंट सुविधा सुरू करण्याबाबत १५ दिवसांत प्रणालीविषयी तांत्रिक बाबींची पूर्तता करून अखेर यशस्वी प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेतली, त्याला यश आले आहे. रविवार (दि. १) पासून सुरू करण्यात येत आहे. कोथरूड आगारात दुपारी १२ वाजता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ई-तिकीट कॅशलेस पेमेंट सुविधा सुरू करण्यात येणार आहे .

ऑनलाइन सुविधांचे हे फायदे -
- प्रवाशांना पीएमपीचा अधिक प्रवास करणे सोपे होणार

-तिकीट घेण्यासाठी सुट्या पैशांच्या समस्सेपासून मुक्ती
- वाहकाकडील कॅश व्यवहार कमी होऊन कामाची गतिशीलता वाढणार

- महामंडळाकडील कॅश व्यवहार कमी होऊन बँकेत पैसे तत्काळ जमा करण्यास सोयीचे होणार आहे.
- त्याचबरोबर लवकरच महामंडळाचे मोबाइल ॲपद्वारे बस ट्रॅकिंग होण्यास मदत

- प्रवासाचे नियोजन व मोबाइल टिकेटिंग सुविधा महामंडळाकडून सुरू करण्यात येणार आहे.

Web Title: Now from Sunday, scan the QR card and get the ticket at PMP too; The inauguration will be done by the guardian minister chandrakant patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.