आता २३ समाविष्ट गावांची सुनावणी ऑनलाईन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:11 AM2021-04-13T04:11:27+5:302021-04-13T04:11:27+5:30

पुणे: पुणे महापालिकेमध्ये नवीन २३ गावांच्या समावेशाबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या एकूण ४९१ हरकती व सूचनांबाबत अर्जावर कोरोना संसर्गाच्या ...

Now the hearing of 23 included villages will be online | आता २३ समाविष्ट गावांची सुनावणी ऑनलाईन होणार

आता २३ समाविष्ट गावांची सुनावणी ऑनलाईन होणार

Next

पुणे: पुणे महापालिकेमध्ये नवीन २३ गावांच्या समावेशाबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या एकूण ४९१ हरकती व सूचनांबाबत अर्जावर कोरोना संसर्गाच्या सद्यपरिस्थितीमुळे व नागरिकांच्या सुरक्षिततेचे दृष्टीने सुनावणीचे कामकाज संबंधित ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करून ऑनलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णय विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे.

राज्य शासनाने हवेली तालुक्यातील २३ गावे पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या १९ एप्रिल रोजी सूस-१, कोपरे-१, नऱ्हे-१, वडाची वाडी-१, नांदोशी-१, किरकिटवाडी-१, होळकरवाडी-२, मांजरी बु-५, कोळेवाडी-५, वाघोली-५, सर्वसाधारण अर्ज-११, नांदेड-६८ या गावांची तर २० एप्रिल रोजी पिसोळी-३८९ अशा ४९१ प्राप्त अर्जावर ऑनलाईन पध्दतीने सुनावणी घेण्यात येणार आहे.

सुनावणीसाठी ऑनलाईन लिंक संबंधित ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपलब्ध करुन देणार आहे. त्याकरिता स्वतंत्र स्लॉट उपलब्ध करून दिले जातील. तरी त्याच वेळी सुनावणीसाठी त्या ठिकाणी कोरोना संदर्भातील नियमांचे पूर्ण पालन करुन उपस्थित रहाणेबाबत संबंधितांना आवाहन करण्यात येत आहे. ऑनलाईन सुनावणीसाठी नेमलेल्या स्लॉटची माहिती संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाचे नोटीस बोर्डवर प्रसिध्द करणेत येईल. तसेच संबंधीत हरकतदार यांना वैयक्तिकरित्या नोटीसा देणार असून सुनावणीसाठी उपस्थित राहावयाचे ठिकाण नोटिशीमध्ये नमूद करणार आहे, असेही विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कळविले आहे.

Web Title: Now the hearing of 23 included villages will be online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.