महाविद्यालयातही आता शारीरिक शिक्षणाचे धडे

By admin | Published: November 30, 2014 12:21 AM2014-11-30T00:21:31+5:302014-11-30T00:21:31+5:30

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाच्या (एफ. वाय.) विद्याथ्र्याना 2क्15-16 या शैक्षणिक वर्षापासून शारीरिक शिक्षण हा विषय सक्तीचा करण्यात आला आहे.

Now the lessons of physical education in college | महाविद्यालयातही आता शारीरिक शिक्षणाचे धडे

महाविद्यालयातही आता शारीरिक शिक्षणाचे धडे

Next
राहुल शिंदे - पुणो
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पुणो, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाच्या (एफ. वाय.) विद्याथ्र्याना 2क्15-16 या शैक्षणिक  वर्षापासून शारीरिक शिक्षण हा विषय सक्तीचा करण्यात आला आहे. परिणामी, सर्व महाविद्यालयांना विद्याथ्र्यासाठी खेळाचे मैदान आणि विविध खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.
राज्यातील सर्व विद्यापीठांनी फिजिकल फिटनेस प्रोग्राम अंतर्गत विद्याथ्र्याना शारीरिक शिक्षणाचे धडे द्यावेत, असे आदेश राज्य शासनातर्फे देण्यात आले आहेत. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाने यासंदर्भातील अभ्यासक्रम तयार करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. गजानन खराटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने दिलेला अभ्यासक्रम विद्यापीठाच्या विद्या परिषदेत मंजूर करण्यात आला असून, तो 2क्15-16 या शैक्षणिक वर्षापासून लागू केला जाणार आहे. विद्याथ्र्याना विविध खेळांविषयी आवड निर्माण व्हावी. तसेच सशक्त व सक्षम युवक तयार व्हावेत, ही कल्पना समोर ठेवून विद्यापीठांतर्फे या पुढील काळात विद्याथ्र्याना विविध क्रीडा प्रकारांचे ज्ञान दिले जाणार आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, अशा सर्व विद्याशाखेच्या विद्याथ्र्याना खेळाचे तास उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत.
 प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्याथ्र्याना विविध खेळांच्या माध्यमातून शारीरिक शिक्षणाचे धडे दिले जातात. मात्र, आता विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षणशास्त्र विद्याशाखेने व्यापक आरोग्यस्तराच्या अभ्यासक्रमास मंजुरी दिली आहे. त्यामुळे सर्व महाविद्यालयांना आपल्या नियोजित वेळापत्रकात काही तास खेळासाठी राखीव ठेवावे लागणार आहेत. महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालकांकडून विविध खेळांच्या माध्यमातून विद्याथ्र्याची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. प्रत्येक विद्याथ्र्याला या चाचणीच्या आधारे ग्रेड दिले जातील. तसेच, संबंधित विद्याथ्र्याने कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा, याबाबत मार्गदर्शन सर्व विद्याथ्र्याना केले जाईल. प्रत्येक विद्याथ्र्याचे ग्रेड कार्ड तयार करण्यात येईल. ज्या महाविद्यालयात विद्याथ्र्याची संख्या अधिक आहे,अशा महाविद्यालयांनी ट्रेनर्सची नियुक्ती केली जाईल, असे विश्वसनीय सूत्रंनी सांगितले.
 
आवड निर्माण व्हावी 
4विद्याथ्र्याना विविध खेळांविषयी आवड निर्माण व्हावी. तसेच, सशक्त व सक्षम युवक तयार व्हावेत ही कल्पना समोर ठेवून विद्यापीठांतर्फे या पुढील काळात विद्याथ्र्याना विविध क्रीडा प्रकारांचे ज्ञान दिले जाणार आहे.
 
क्रीडांगण नसणारी महाविद्यालये समोर येणार 
शासननिर्णयानुसार कोणतेही महाविद्यालय सुरू करण्यासाठी संबंधित महाविद्यालयाकडे क्रीडांगण असणो बंधनकारक आहे.परंतु, विद्यापीठाशी संलग्न असलेल्या शहरी भागातील अनेक महाविद्यालयांना खेळाचे मैदान नाहीत,त्याचप्रमाणो बहुतांश विनाअनुदानित महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालकाचे पद रिक्त आहे. परिणामी, क्रीडांगणो व शारीरिक शिक्षण संचालक नसणा:या महाविद्यालयांची मोठी यादी समोर येणार आहे.

 

Web Title: Now the lessons of physical education in college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.