आता ‘घरात येऊ लस देऊ’ या उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:08 AM2021-06-11T04:08:41+5:302021-06-11T04:08:41+5:30

पुणे : दिव्यांग, वयोवृद्ध, रुग्णशय्येवरील व्यक्ती यांना घरात जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा प्रारंभ गुरुवारी पुण्यात झाला़ फिरत्या ...

Now let's get vaccinated at home | आता ‘घरात येऊ लस देऊ’ या उपक्रम

आता ‘घरात येऊ लस देऊ’ या उपक्रम

Next

पुणे : दिव्यांग, वयोवृद्ध, रुग्णशय्येवरील व्यक्ती यांना घरात जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा प्रारंभ गुरुवारी पुण्यात झाला़ फिरत्या लसीकरण केंद्राच्या माध्यमातून घरोघरी जाऊन लस देण्याचा महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम आहे.

स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या पुढाकाराने कसबा मतदारसंघात या उपक्रमाची सुरुवात झाली असून, याचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवशी करण्यात आले़ यावेळी खासदार गिरीश बापट, भाजप पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते गणेश बिडकर, सरचिटणीस राजेश पांडे, दत्ता खाडे, नगरसेवक राजेश येनपुरे, गायत्री खडके, दीपक पोटे, सुशील मेंगडे, स्मिता वस्ते, सरस्वती शेंडगे आदी उपस्थित होते. कसबा विधानसभा मतदार संघातील ६ हजार २०० नागरिकांना की जे दिव्यांग, वयोवृद्ध आहेत अशांना त्यांच्या घरांमध्ये जाऊन लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

उद्घाटनप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी कोविड काळात आर्थिक आणि आरोग्यविषयक मदतीची समाजामध्ये मोठी गरज असताना, नगरसेवक हेमंत रासने यांच्या पुढाकाराने दिव्यांग, वयोवृद्ध, रुग्णशय्येवरील व्यक्ती यांना घरात जाऊन लस देण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले़

हेमंत रासने यांनी ‘घरात येऊ लस देऊ’ या उपक्रमाअंतर्गत लसीकरण करणा-या तीन गाड्या कसबा मतदारसंघामध्ये फिरणार असल्याचे सांगितले़ त्यामध्ये लसीकरण संबंधित सर्व साहित्य, सुविधा व डॉक्टरांची टीम असणार असून, या उपक्रमामुळे ज्यांना घराबाहेर पडणे शक्य नाही, अशा नागरिकांची सोय होणार असल्याचे ते म्हणाले़

-----------------------

फोटो मेल केला आहे़

Web Title: Now let's get vaccinated at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.