आता मोबाईल सांगणार हवेतील ‘विषारीपणा’!

By Admin | Published: February 17, 2015 01:12 AM2015-02-17T01:12:19+5:302015-02-17T01:12:19+5:30

आता आपल्या शहराच्या कोणत्या भागातील हवेत किती प्रदूषण आहे, किती विषारी तत्त्वे आहेत व त्याचा शरीरावर काय परिणाम होईल,

Now mobile will tell 'toxicity'! | आता मोबाईल सांगणार हवेतील ‘विषारीपणा’!

आता मोबाईल सांगणार हवेतील ‘विषारीपणा’!

googlenewsNext

पुणे : आता आपल्या शहराच्या कोणत्या भागातील हवेत किती प्रदूषण आहे, किती विषारी तत्त्वे आहेत व त्याचा शरीरावर काय परिणाम होईल, याची माहिती अजूनही मोबाईलवर मिळत नाही. पण आता दिल्ली आणि पुण्यातील नागरिकांना मोबाईल ही माहिती पुरविणार आहे. यासाठी पाषाण येथील भारतीय उष्णकटिबंधीय हवामान विज्ञान संस्थेने (आयआयटीएम) खास मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. विशेष म्हणजे, हे अ‍ॅप ही माहिती देण्याबरोबर आरोग्यपूर्ण सल्लाही देणार आहे. देशातील अशा प्रकारचे हे पहिलेच अ‍ॅप असणार आहे.
शहरांमधील तापमान, हवामानाबरोबर वेगवेगळ्या ठिकाणच्या हवेतील प्रदूषणांची माहिती देण्यासाठी आयआयटीएमने सिस्टीम फॉर एअर क्वॉलिटी फोरकास्टिंग अ‍ॅन्ड रिसर्च (सफर) हा प्रकल्प हाती घेतला. २०१० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेच्या मुहूर्तावर दिल्लीत सफर हा प्रकल्प सुरू केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुणे, मुंबई, चेन्नई, कोलकता, अहमदाबाद या शहरांत सफर हा प्रकल्प सुरू केला. याअंतर्गत शहरांच्या विविध भागांत मॉनिटरिंग सिस्टीम उभारण्यात आल्या आणि मोठे एलईडी टीव्ही लावण्यात आले असून, त्यावर तापमान, हवामानाबरोबर हवेतील विविध तत्त्वांची माहिती देण्यात येत आहे. हा प्रकल्प गेल्या ५ वर्षांपासून उत्तमरीत्या सुरू असून त्यातील पुढील टप्पा म्हणून आता मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे.
याबाबत सफर प्रकल्पाचे प्रमुख डॉ. गुफ्रान बेग ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, की केंद्रशासनाचा सफर हा उपक्रम गेल्या ५ वर्षांपासून उत्तमरीत्या सुरू असून, त्यातून मिळणाऱ्या माहितीमुळे संशोधनास मदत होत आहे. सफरकडून दिली जाणारी माहिती नागरिकांना आपल्या मोबाईलवर मिळावी यासाठी सफर एअर अ‍ॅप विकसित करण्यात आला आहे. हा मोफत असून पहिल्या टप्प्यात दिल्ली आणि पुणे येथे हा अ‍ॅप सुरू करण्यात येईल. या अ‍ॅपवर शहराच्या विविध भागांमधील हवेतील विषारी तत्त्वांची माहिती मिळेल. त्याचा शरीरावर काय परिणाम होईल आणि त्यासाठी काय काळजी घ्याल, यासंदर्भातील सल्लाही दिला जाईल. देशातील अशा प्रकारचे हे पहिलेच अ‍ॅप असणार आहे. दुसऱ्या टप्प्यात एप्रिल महिन्यात मुंबईत हे अ‍ॅप सुरू करण्यात येईल. (प्रतिनिधी)

सफर एअर अ‍ॅपमध्ये ही माहिती मिळणार
सफर एअर अ‍ॅपमध्ये शहराच्या विविध भागांमधील तापमान, हवामानाचा अंदाज दिला जाणार आहे. त्याबरोबर त्या भागातील ओझोनचे प्रमाण, आॅक्साइड आॅफ नायट्रोजनचे (एनओएक्स) प्रमाण, कार्बन मोनॉक्साइडचे (सीओ) प्रमाण, हवेतील धूलिकणांचे प्रमाण (पीएम २.५, १०), ब्लॅक कार्बनचे (बीसी) प्रमाण आदींची सखोल माहिती दिली जाणार आहे. हे प्रमाण किती असले तर नॉर्मल आहे, किती झाले तर त्याचा शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो, याचीही माहिती दिली जाणार आहे.

Web Title: Now mobile will tell 'toxicity'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.