आता पावसाच्या ‘कमबॅक’ची गरज!

By admin | Published: July 29, 2016 03:54 AM2016-07-29T03:54:11+5:302016-07-29T03:54:11+5:30

जून व जुलै महिन्याची सरासरी ओलांडून गेले पंधरा दिवस पावसाने उघडीप दिली आहे. या काळात पेरण्यांनी वेग घेऊन आता पिकांची उगवण झाली असून, पावसाच्या

Now the need for rain! | आता पावसाच्या ‘कमबॅक’ची गरज!

आता पावसाच्या ‘कमबॅक’ची गरज!

Next

पुणे / मंचर : जून व जुलै महिन्याची सरासरी ओलांडून गेले पंधरा दिवस पावसाने उघडीप दिली आहे. या काळात पेरण्यांनी वेग घेऊन आता पिकांची उगवण झाली असून, पावसाच्या ‘कमबॅक’कडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आतापर्यंत ४५३.७ मिमी पाऊस झाला आहे.
मध्यंतरी पडलेला दमदार पाऊस खरीप हंगामासाठी फायदेशीर ठरला व त्यानंतर कामे मार्गी लागली. चांगला पाऊस पडल्याने पाणीसाठा बऱ्यापैकी जमा झाला. त्या वेळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. खरिपातील नगदी पिकांसाठीसुद्धा हा पाऊस फायदेशीर ठरला गेला. चांगल्या पावसाने पिके तरारली गेली. त्यानंतर पावसाने पूर्णपणे उघडीप दिली.
नगदी पिकांना पाणी देण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. पावसाची सध्या नितांत आवश्यकता आहे. खरिपातील पिकांची उगवण होत असून, त्यासाठी पाऊस पडला पाहिजे. सध्या आकाश अंधारून येते; मात्र दमदार पाऊस पडताना दिसत नाही. रिमझिम पाऊस सध्या पुरेशा प्रमाणात पडत नसून दिवसभर कडक ऊन पसरलेले असते. पावसाने पुन्हा कमबॅक केले तर धरणांतील साठा वाढण्यास मदत होईल. पाऊस अजून लांबला तर मात्र पिकांना त्याचा फटका बसेल. (प्रतिनिधी)

Web Title: Now the need for rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.