आता महिलांसाठीही खुले कारागृह उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:08 AM2021-07-18T04:08:50+5:302021-07-18T04:08:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सध्या पुरुष कैद्यांसाठी खुली कारागृहे आहेत. त्याअनुषंगाने महिलांसाठी खुली कारागृहे निर्माण करण्यात येईल. तसेच ...

Now an open prison will be set up for women as well | आता महिलांसाठीही खुले कारागृह उभारणार

आता महिलांसाठीही खुले कारागृह उभारणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सध्या पुरुष कैद्यांसाठी खुली कारागृहे आहेत. त्याअनुषंगाने महिलांसाठी खुली कारागृहे निर्माण करण्यात येईल. तसेच कारागृह विभागाचे सध्या मुख्यालय जुन्या मध्यवती इमारतीमध्ये आहे. आता येरवडा मध्यवर्ती कारागृहाकडील असणाऱ्या जागेवर नवीन कारागृह मुख्यालयाची इमारत बांधण्यात येईल. यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

कारागृह विभागाचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी येरवडा कारागृहाला भेट दिली. या वेळी अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक संजय पांडे, अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, येरवडा कारागृह अधीक्षक यू. टी. पवार उपस्थित होते. कारागृह विभागाचे सादरीकरण सुनील रामानंद यांनी केले.

या वेळी दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई येथे बहुमजली कारागृह उभारणे, महिला कैद्यांसाठी खुले कारागृह निर्माण करणे, तसेच कैद्यांना न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ट्रायलसाठी हजर करण्यासाठी सीआरपीमध्ये दुरुस्ती करून जास्तीत जास्त प्रमाणात व्हीसीचा वापर करून कैद्यांचा वेळ वाचेल. न्यायप्रक्रिया जलद होईल, यासाठी तत्काळ आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले. कारागृह मुख्यालयाच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले.

फोटो - दिलीप वळसे पाटील

Web Title: Now an open prison will be set up for women as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.