आता अँटिजेन किटचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:13 AM2021-04-28T04:13:02+5:302021-04-28T04:13:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असताना आता अँटिजेन ...

Now the shortage of antigen kits | आता अँटिजेन किटचा तुटवडा

आता अँटिजेन किटचा तुटवडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असताना आता अँटिजेन किट्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळेच पुणे जिल्हा परिषदेला मंगळवारी जिल्ह्यातील बहुतांश हॉटस्पॉट गावांतील कोरोना तपासणीचे कॅम्प रद्द करावे लागले.

अँटिजेन किटचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांकडून पुरवठा थांबल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर मंगळवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पडसाद उमटले. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी बुधवारसाठी दहा हजार किट उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. तुटवड्याची स्थिती लक्षात घेता जिल्हा परिषदेने अँटिजेन तातडीने खरेदी करण्याची मागणी बैठक झाली.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक अध्यक्ष निर्मला पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष रणजित शिवतरे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, कृषी पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह सदस्य आणि अधिकाऱ्यांची ऑनलाईन उपस्थिती होती.

जिल्ह्यामध्ये ग्रामीण क्षेत्रात दररोज आठ ते दहा हजार कोरोना टेस्ट केल्या जातात. सध्या हॉटस्पॉट गावांची संख्या वाढल्याने गावोगाव अँटिजेन टेस्टचे कॅम्प आयोजित केले जात आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून टेस्टसाठी किटचा तुटवडा भासू लागल्याने कॅम्पमध्ये तपासण्याची संख्यादेखील कमी झाली आहे. आज अनेक गावांमधील कॅम्प किटअभावी रद्द करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सर्व सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा अध्यक्ष निर्मला पानसरे आणि आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडून किटचा पुरवठा होत नसेल तर जिल्हा परिषदेने तातडीने किट खरेदी करावीत असे सांगितले.

अँटिजेन किट्स पुरवठा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यामार्फत केला जातो. पुरवठादाराने परवडत नसल्याने किटचे दर वाढवून देण्याची मागणी करत पुरवठा थांबवला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बिलोलीकर यांनी आणखीन १० हजार किट उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. मात्र किटचा पुरवठा आणि हॉटस्पॉट गावांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना चाचण्या अधिक वेगाने करावे लागतील, अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेने किट खरेदी करावीत. अशी मागणी शरद बुट्टे पाटील, आशा बुचके, वीरधवल जगदाळे, दिलीप आबा यादव यांच्यासह सर्व सदस्यांनी केली. किट खरेदी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मार्फत होते. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला आहे. पुरवठादाराकडून जादा दराची मागणी होत असल्याने अडचण आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

-----

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणि हॉटस्पॉट गावे लक्षात घेता कोरोना चाचण्या अधिक गतीने करावे लागतील. पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्केपेक्षा जास्त आहे .कॅम्पसाठी अँटिजेन किट्स अपुरी पडत आहेत. अशा वेळी गरज पडल्यास जिल्हा परिषदेमार्फत किटची खरेदी केली जाईल.

- प्रमोद काकडे, आरोग्य सभापती

Web Title: Now the shortage of antigen kits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.