आता चार वाजताच शटर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:08 AM2021-06-27T04:08:10+5:302021-06-27T04:08:10+5:30

पुणे : राज्य शासनापाठोपाठ महापालिकेनेही नवीन आदेश काढत पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवांची दुकाने सोडून अन्य दुकाने ...

Now shutter down at four o'clock | आता चार वाजताच शटर डाऊन

आता चार वाजताच शटर डाऊन

Next

पुणे : राज्य शासनापाठोपाठ महापालिकेनेही नवीन आदेश काढत पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवांची दुकाने सोडून अन्य दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी

चार वाजेपर्यंतच सुरू राहतील. मात्र ही दुकाने शनिवार व रविवार पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह बंदच राहणार आहेत. त्यामुळे आता चार वाजताच दुकानांचे शटर डाऊन करावे लागणार आहे. जे आतापर्यंत ७ वाजेपर्यंत होते.

रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट - सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत. तर, दुपारी चारनंतर तसेच शनिवार व रविवार रात्री११ वाजेपर्यंत फक्त पार्सल सेवा / घरपोच सेवा देता येणार आहे. सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, खुली मैदाने ही केवळ चालणे व सायकलिंगसाठी आठवड्यातील सर्व दिवस सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच सकाळी ५ ते ९ या वेळेत आऊटडोअर खेळ खेळता येऊ शकणार आहेत. तसेच व्यायामशाळाही पाच दिवस सुरू राहतील. ई-कॉमर्स, कृषिसंबंधी सर्व सेवा-व्यवसाय सुरू ठेवता येणार आहेत. संध्याकाळी पाचनंतर मात्र जमावबंदी आणि संचारबंदी लागू आहे.

राज्य शासनाने राज्यातील कोविडची परिस्थिती लक्षात घेता निर्बंध लागू केले आहेत. शासनाच्या आदेशाप्रमाणे पालिकेनेही निर्बंध लागू केले आहेत. यापूर्वी संध्याकाळी सातपर्यंत असलेली दुकानांची वेळ तीन तासांनी कमी करण्यात आली आहे. तर, हॉटेल-रेस्टॉरंट-बार यांची वेळही सहा तासांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

----

कार्यक्रमांना ५० जणांची उपस्थिती

सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, लग्न व मनोरंजन कार्यक्रम यापूर्वीच्या आदेशाप्रमाणे ५० लोकांच्या उपस्थितीत घेता येणार आहेत. या कार्यक्रमांना सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंतच परवानगी राहणार आहे. हे कार्यक्रम ३ तासांपेक्षा अधिक काळ असू नयेत.

----

अंत्यविधी, दशक्रियांसाठी २० लोकच

सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील. दैनंदिन पूजा / अर्चना करण्याकरिता परवानगी राहील. अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडित कार्यक्रम जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.

-----

बांधकाम दुपारी चारपर्यंत

ज्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे, असे बांधकाम सुरू ठेवता येतील. बाहेरून येणारे कामगार असल्यास असे बांधकाम दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी राहील.

-----

१.पीएमपी आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू राहील.

२. माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना नियमानुसार प्रवास करण्यास परवानगी.

३. खासगी वाहनांतून, बस तसेच लांब अंतराच्या रेल्वेमधून आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी.

४. ही वाहने शासनाने घोषित केलेल्या लेव्हल ५ मधील ठिकाणी थांबणार असतील तर ई-पास बंधनकारक.

५. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग, कच्चा माल उत्पादन करणारे युनिट, पॅकेजिंग करणारे युनिट आणि संपूर्ण पुरवठा साखळीला परवानगी.

------

शाळा, महाविद्यालये १५ जुलैपर्यंत बंद

पालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था येत्या १५ जुलैपर्यंत पूर्णतः बंद राहतील. सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था पूर्णतः बंद राहतील. मात्र ऑनलाइन शिक्षणास मुभा राहील.

------

मद्यविक्री चारवाजेपर्यंतच

मद्यविक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवार होम डिलिव्हरी सुविधा सुरू राहील.

Web Title: Now shutter down at four o'clock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.