आता दरमहा भूजल पाहणी

By admin | Published: March 26, 2017 02:33 AM2017-03-26T02:33:48+5:302017-03-26T02:33:48+5:30

मान्सूनपासून राज्यातील तब्बल ४० हजार विहिरींच्या माध्यमातून प्रथमच भूजल निरीक्षण नोंदविण्यात येणार असून

Now survey the ground water every month | आता दरमहा भूजल पाहणी

आता दरमहा भूजल पाहणी

Next

पुणे : मान्सूनपासून राज्यातील तब्बल ४० हजार विहिरींच्या माध्यमातून प्रथमच भूजल निरीक्षण नोंदविण्यात येणार असून, दर महिन्याला भूजल स्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यासाठी तब्बल २१ हजार जलसंरक्षक निश्चित करण्यात आले आहेत.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे भूजल पातळीचा अभ्यास करण्यात येतो. त्यासाठी राज्यातील ३ हजार ९२० निरीक्षण विहिरींच्या पातळीचा आधार घेण्यात येतो. त्यानुसार संभाव्य टंचाईग्रस्त गावांची यादी भूजल विभागातर्फे जाहीर होते. त्यामुळे टंचाई निवारण कामांचे नियोजन शक्य होते.
विहिरींच्या पातळीच्या नोंदीसाठी सरकारने गावपातळीवर २१ हजार जलसुरक्षक नेमले आहेत. ते मोबाईलद्वारे पाणी पातळीची माहिती भूजल संकेतस्थळास पाठवतील. संकेतस्थळावरील प्रणाली माहितीची नोंद स्वत:हून करेल. त्यामुळे विस्तृत माहिती मिळेल, असे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक सुनील पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Now survey the ground water every month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.