आता जेवायला येण्याचे राहून गेले : संतोष देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:10 AM2021-05-17T04:10:13+5:302021-05-17T04:10:13+5:30
संतोष देसाई यांनी सांगितले की, फर्ग्युसन महाविद्यालयात तो बीएस्सीला व मी बी. एला शिकत होतो. अगोदरच्या वर्षी निवडणुकीत माझा ...
संतोष देसाई यांनी सांगितले की, फर्ग्युसन महाविद्यालयात तो बीएस्सीला व मी बी. एला शिकत होतो. अगोदरच्या वर्षी निवडणुकीत माझा पराभव झाला होता. दुसऱ्या वर्षी माझ्या विरोधकांनी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या राजीवला उभे केले होते. फर्ग्युसनचे वसतिगृह माझ्या पाठीशी असल्याने निवडणुकीत माझा विजय झाला. त्यानंतर काही दिवस आमच्यात बोलणे झाले नाही. त्यानंतर तो आजारी असल्याचे मला समजले. मी मित्रांबरोबर त्याला भेटायला गेलो होतो. तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. मी म्हणालो, निवडणूक झाली संपले. आता आपण मैत्र आहोत. तेव्हापासून आमची शेवटपर्यंत मैत्री होती. तो युवक प्रदेशाध्यक्ष, पुढे राष्ट्रीय अध्यक्ष झाला तरी त्याचा फाेन येत असे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्याच्या प्रचारासाठी राहुल गांधी आले होते. तेव्हा आम्ही गेलो होतो. राज्यसभेसाठी खासदारकीचा अर्ज भरण्याच्या वेळीही त्याने आवर्जुन बोलावले होते. जहांगीरला त्याला दाखल केले. गेल्या १५ दिवसांपासून हॉस्पिटलला जाऊन येत होतो. आता असा मित्र पुन्हा हाेणे नाही, असे संतोष देसाई यांनी सांगितले.