.....आता गुन्हेगारांना पुणे शहर पोलीस दलाची कारवाईची 'हवा' दाखवू: पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा सज्जड इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 05:05 PM2021-04-14T17:05:13+5:302021-04-14T17:05:54+5:30

उरुळीकांचन दूरक्षेत्रात बीट मार्शल सेवा सुरू

..... Now we will show the 'air' of action of Pune city police force to the criminals: Police Commissioner Amitabh Gupta's stern warning | .....आता गुन्हेगारांना पुणे शहर पोलीस दलाची कारवाईची 'हवा' दाखवू: पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा सज्जड इशारा

.....आता गुन्हेगारांना पुणे शहर पोलीस दलाची कारवाईची 'हवा' दाखवू: पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा सज्जड इशारा

Next
ठळक मुद्देगुन्हेगारी, वाहतुक नियंत्रण, अर्थिक, सायबर गुन्हे, अवैध धंदे, वाळू तस्करी अवैध सावकारी या गुन्हेगारीवर कठोर कारवाई

उरुळी कांचन: पुणे शहर पोलिस आयुक्तालयात समाविष्ट झालेल्या लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या विभाजन प्रस्तावाचा  निर्णय लोकसंख्या व हद्दीच्या निकषात बसवून  घेण्यात येईल, परंतु सध्यस्थितीत लोणी काळभोर पोलिस ठाण्याअंतर्गत उरुळीकांचन दूरक्षेत्रासाठी आवश्यक संख्याबळ उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही सुरू आहे. लोणीकाळभोर व लोणीकंद ही दोन पोलिस ठाणी ग्रामीण पोलिस दलातून पुणे शहर पोलिस दलात समाविष्ठ झाली असल्याने , या हद्दीतील गुन्हेगारी , वाहतुक नियंत्रण , अर्थिक , सायबर गुन्हे, अवैध धंदे, वाळू तस्करी अवैध सावकारी या गुन्हेगारीवर कठोर कारवाई करुन या हद्दीत पुणे शहर पोलिसांची ' हवा ' काय आहे ते दाखवू असा सजड इशारा पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे. 

पुणे शहर पोलिस आयुक्तालय अंतर्गत लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील उरुळी कांचन पोलिस दूरक्षेत्रात बीट मार्शल (२४ तास पोलिस मदत सेवा ) युनिटच्या सेवेचा शुभारंभ पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते आज करण्यात आला. याप्रसंगी युनिटच्या पोलिस पथकाला हिरवा झेंडा दाखवून गुप्ता यांनी शुभारंभ केला. यावेळी हडपसर परिमंडळ ५ च्या उपायुक्त नम्रता पाटील,सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याण विधाते , लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष काळे, उरुळी कांचन पोलिस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार, ग्रामीण पोलिस दलातील मावळते सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन चौधरी, उरुळी कांचनचे सरपंच संतोष कांचन , उपसरपंच संचिता कांचन, हवेली पंचायत समितीच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर आदी उपस्थित होते. 

पोलिस आयुक्त अभिताभ गुप्ता म्हणाले की, लोणी काळभोर पोलिस ठाणे पुणे शहरात २३ मार्च रोजी समाविष्ट केल्यानंतर लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात मंजूर संख्याबळातील ५० टक्के कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली आहे.उर्वरीत येत्या सहा महिन्यांत टप्याटप्याने येतील. या ठिकाणी शहराप्रमाणे प्रत्येक विभागानुसार अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.या ठिकाणी तत्पर सेवेसह सामान्यांना आश्वासक पोलिस सेवा कशी देता येईल हे प्राधान्य असणार आहे. कार्यक्रमात सरपंच संतोष उर्फ पप्पू कांचन यांनी उरुळी कांचन पोलिस दूरक्षेत्रासाठी आयुक्तांच्या मागणीनुसार २० गुंठे जागा उपलब्ध करुन देण्याचे अश्वासन दिले आहे. कार्यक्रमात आभार प्रदर्शन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी केले आहे. 

उरुळी कांचन पोलिस दूरक्षेत्राची हद्द लोणी काळभोर पोलिस ठाण्यात राहणार का पुणे शहर आयुक्तालयाच्या अंतर्गत स्वतंत्र पोलिस ठाणे अस्तित्वात येणार? तसेच ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या उरुळी कांचन स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण करण्याच्या प्रलंबित प्रस्तावाची पोलिस महासंचालक यांच्याकडील स्थिती नेमकी काय आहे ? यासंदर्भातील माहिती पत्रकारांनी अमिताभ गुप्ता यांना विचारली ,त्यावर नवीन पोलिस ठाणे अस्तित्वात आणण्यासाठी शासनाला ८ कोटी रुपये खर्च करावा लागतो व या संपूर्ण प्रक्रियेला ८ ते १० महिन्यांची वेळ अपेक्षित आहे. या भागातील भौगोलिक हद्दीचे विभाजन करुन नवीन पोलीस ठाणे अस्तित्वात आणण्याचे विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: ..... Now we will show the 'air' of action of Pune city police force to the criminals: Police Commissioner Amitabh Gupta's stern warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.