आता तुम्हीच सांगा, ठरवा दुसरा डोस कोणता घ्यायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:10 AM2021-05-16T04:10:14+5:302021-05-16T04:10:14+5:30

--- पुणे : कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींच्या पुरवठ्याच्या नियोजनाचा पुरता बोजवारा प्रशासकीय पातळीवर उडाला असतानाच, लसीकरण ...

Now you decide, which is the second dose to take? | आता तुम्हीच सांगा, ठरवा दुसरा डोस कोणता घ्यायचा?

आता तुम्हीच सांगा, ठरवा दुसरा डोस कोणता घ्यायचा?

Next

---

पुणे : कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींच्या पुरवठ्याच्या नियोजनाचा पुरता बोजवारा प्रशासकीय पातळीवर उडाला असतानाच, लसीकरण केंद्रावरही कोणाला कोणती लस दिली गेली, त्याच्या नोंदीच झाल्या नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे दुसरी डोस घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना तुम्हाला कोणती लस घ्यायची ते तुम्हीच ठरवा, अशी उत्तरे लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी नागरिकांना दिली.

सिंहगड रस्त्यावरील मुरलीधर लायगुडे रुग्णालयात अशा प्रकारचा गोंधळ झाल्याचे सष्ट झाले आहे. धायरी येथील गणेश नभांगण सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका दांपत्याला यांनी एक एप्रिल रोजी लस लायगुडे रुग्णालयातील केंद्रावर लस घेतली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास लसीकरणासाठी तुरळक गर्दी असल्याने काही मिनिटांमध्ये या दांपत्याचे लसीकरण पूर्ण झाले. लसीकरण करण्याआधी तेथे संगणकावर त्यांची नोंदणीकरण्यासाठी त्यांना नाव मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक आदींची विचारणा करण्यात आले. त्यानंतर दोघांनाही लस देण्यात आली व दुसरा डोस घेण्यासाठी ४५ दिवसांनी येण्यास सांगितले. दरम्यान, लस देण्यात आल्यानंतरही त्या दोघांच्याही मोबाईलवर लस घेतल्याचा मेसेज आला नाही.

घरी गेल्यानंतर, त्यांनी कोविन ॲपमध्ये लसीकरणाचे प्रमाणपत्र शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांचे केवळ नोंदणी झाली असून पहिल्या लसीकरणासाठी अपॉइंटमेंट घ्या, असा संदेश दिसत होता. दरम्यान, त्यांनी दोनवेळी केंद्रावर जाऊन कोणतीही बाब सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे त्यांना कुणीच दाद दिली नाही व गर्दी होऊ नये यासाठी ४५ दिवसांनी या त्यावेळी सांगू, असे उत्तर देऊन परत पाठविण्यात आले. सुमारे ४५ दिवसांनी त्यांनी लसीकरण केंद्रावर संपर्क केला. मात्र, त्यांच्या पहिल्या लसीकरणाची नोंदच नसल्याचे सांगिण्यात आले. एक एप्रिल रोजी या केंद्रावर कोवॅक्सिन लस दिले गेले की कोविशिल्ड याची विचारणा करून रजिस्टर तपासण्यास सांगितले. मात्र, आता वेळ नसल्याचे सांगून त्यांना पिटाळण्याचा प्रयत्न केला गेला. अखेर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केल्यावर तेथील काही कर्मचाऱ्यांनी एक एप्रिल रोजीचे नोंदणी रजिस्टर तपासून त्या दिवशी केंद्रामध्ये साऱ्यांनाच कोविशिल्ड लस देण्यात आले असल्याचे सांगितले. मात्र, त्या रजिस्टमध्येही या दांपत्याची नोंदच नव्हती. त्यामुळे अशा किती नागरिकांचे लसीकरण नोंदणीशिवाय झाले, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

---

कोट

ओटीपीशिवाय लस घेणे ही नागरिकांची चूक

--

लसीकरणाचे रजिस्ट्रेशन झाल्यावर मोबाईलवर ओटीपी येतो तो ओटीपी केंद्रावर सांगितल्याशिवाय लस दिली जात नाही. सर्वच नागरिकांना याची संपूर्ण माहिती आहेच. त्यामुळे नोंदणीशिवाय लस दिली गेली असेल, तर ती चूक त्या नागरिकाचीच आहे. असे अनेक प्रकार घडले असतील तर प्रशासनाची टेक्निकल टीम त्याचा शोध घेईल व कोणत्या तारखेला कोणती लस केंद्रात दिली गेली, त्यावरून नागरिकांना लसीकरणाचे नाव सांगितले जाईल. कोविन ॲपमध्येही अनेक अपडेट झाले आहेत त्यामुळे त्या ॲपमध्येही काही चुका झाल्या असतील, तर त्या दुरुस्त केल्या जातील. अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.

Web Title: Now you decide, which is the second dose to take?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.