आवडीच्या नंबरसाठी आता मोजावे लागणार दुप्पट पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 09:48 AM2022-09-26T09:48:55+5:302022-09-26T09:49:39+5:30

विशेषत: राजकारणी, व्यावसायिक, उद्योगपती यासह युवा वर्गामध्ये चॉईस नंबर घेण्यासाठी चढाओढ असते...

Now you have to pay twice as much for the number of your choice | आवडीच्या नंबरसाठी आता मोजावे लागणार दुप्पट पैसे

आवडीच्या नंबरसाठी आता मोजावे लागणार दुप्पट पैसे

googlenewsNext

पुणे : आपल्याकडेदेखील चारचाकी किंवा दुचाकी असावी, असे आपल्यापैकी अनेकांना वाटते. त्या गाडीचा नंबरदेखील पसंतीचा असावा, यासाठी अनेकजण कितीही पैसे मोजण्यासाठी तयार असतात. याला लकी नंबर असेही अनेकजण म्हणतात. विशेषत: राजकारणी, व्यावसायिक, उद्योगपती यासह युवा वर्गामध्ये चॉईस नंबर घेण्यासाठी चढाओढ असते. काही राजकारण्यांसाठी तर त्यांच्या वाहनाचा नंबर नेहमी आरक्षितच ठेवलेला असतो.

काहींनी तर वाहनाच्या किमतीपेक्षा अधिक पैसे चॉईस नंबरसाठी भरल्याच्या घटना आहेत. आता आवडीच्या नंबरसाठी चढाओढ करणाऱ्यांकरिता एक बातमी समोर आली आहे. कारण यापुढे तुम्हाला चॉईस नंबरसाठी दुप्पट पैसेच मोजावे लागणार आहेत. याची अंमलबजावणी पुढील महिन्यापासून होणार आहे.

चारचाकीसाठी ५ लाख

राज्याच्या गृह विभागाकडून काढलेल्या अधिसूचनेनुसार दुचाकीसाठी ०००१ हा क्रमांक हवा असल्यास आता एक लाख व चारचाकीसाठी ५ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. आधी दुचाकीसाठी ५० हजार रुपये व चारचाकीसाठी ४ लाख रुपये दर होता.

व्हीआयपी नंबरचे दर..

नंबर - ०००९, ००९९, ०७८६, ०९९९, ९९९९ - जुना दर - दीड लाख - नवीन दर - अडीच लाख

नंबर - ०१११ ते ०८८८ आणि ११११ ते ८८८८ - जुना दर - ५० हजार - नवीन दर - १ लाख

नंबर - ०००२ ते ०१०० आणि १००१ ते ९०९० - जुना दर - ५० हजार - नवीन दर - १ लाख

नंबर - ७४०० ते ७९७९ आणि ८००० ते ९९०० - जुना दर - १५ हजार - नवीन दर - २५ हजार

नऊ वर्षांनंंतर वाढ..

राज्य सरकारच्या गृह विभागाकडून याबाबतची अधिसूचना काढण्यात आली असून, याआधी ९ वर्षांपूर्वी आवडीच्या नंबरसाठी दर वाढवले होते. त्यानंतर २०२२ साली दरवाढ केली आहे.

राज्याच्या गृह विभागाकडून याबाबतची अधिसूचना काढलेली असली तरी त्यावर नागरिकांच्या सूचना-हरकती मागवण्यात आल्या आहेत. एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. नागरिकांकडून ज्या हरकती व विचार येतील त्यानुसार पुढील निर्णय राज्य सरकार घेईल. आम्ही फक्त दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत असतो.

- संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

 

Web Title: Now you have to pay twice as much for the number of your choice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.