स.प.महाविद्यालयाला एनएसएसचा राज्यस्तरीय पुरस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 07:53 PM2019-09-23T19:53:52+5:302019-09-23T19:54:43+5:30

राज्य शासनातर्फे 1993-94 वषार्पासून राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत पुरस्कार दिले जातात.

NSS State Level Award to SP College | स.प.महाविद्यालयाला एनएसएसचा राज्यस्तरीय पुरस्कार 

स.प.महाविद्यालयाला एनएसएसचा राज्यस्तरीय पुरस्कार 

googlenewsNext
ठळक मुद्दे विलास उगले यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकाऱ्याचा पुरस्कार

पुणे: राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे 2018-19 या शैक्षणिक वषार्तील राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यंदाचा राज्य स्तरावरील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयास मिळाला आहे. तर सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार स.प.महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.विलास उगले यांना जाहीर झाला आहे.
राज्य शासनातर्फे 1993-94 वषार्पासून राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत पुरस्कार दिले जातात. शासनाने 2018-19 या शैक्षणिक वषार्तील पुरस्कारासाठी विद्यापीठाकडून प्रस्ताव मागविले होते.उच्च व तंत्र शिक्षण विभागाने प्राप्त झालेल्या प्रस्तावामधून निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार अध्यादेशाद्वारे जाहीर केले आहेत.त्यात सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला मिळला असून याच विद्यापीठाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.त्र्यंबक पाटील यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिका-याचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.स्मृतिचिन्ह व दहा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पदाचा पुरस्कार स.प.महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.विलास उगले यांच्यासह धुळ्याच्या डॉ.दत्ता ढाले यांना मुंबईच्या रवी चेट्टीयार यांना तर गडचिरोलीच्या प्रदिप चापले यांना जाहीर झाला आहे.

तसेच कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कारासाठी धायरी येथील धायरेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संस्थेच्या कै.बंडोजी खंडोजी चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मदन सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट स्वयंसेवकाचा पुरस्कार पुण्यातील भारती विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सत्यम देवकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न सासवड येथील वाघीरे महाविद्यालयाच्या देवानंद भालेराव,महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न पुण्यातील टिळक आयुर्वेद महाविद्यालयातील आकाश देशमुख आणि धायरीतील बंडोजी खंडोजी विद्यालयाच्या आदित्य दारवटकर यांना जाहीर झाला आहे.
-----------
राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयाला व महाविद्यालयाच्या कार्यक्रम अधिका-यांना पुरस्कार मिळाला याचा मनापासून आनंद होत आहे. देश सेवेचे व्रत घेवून काम करणा-या संस्थेला व व्यक्तीला त्याच्या कामाची पोच पावती मिळते. यंदा महाविद्यालयाचे एनएसएसचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून दोन्ही पुरस्कार मिळणे ही अभिमानाची बाब आहे. शि.प्र.मंडळीकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे हे यश मिळाले.
- डॉ.दिलीप शेठ,प्राचार्य,स.प.महाविद्यालय,पुणे 

Web Title: NSS State Level Award to SP College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.