नाभिक समाज अजूनही आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:11 AM2021-04-16T04:11:37+5:302021-04-16T04:11:37+5:30
याबाबत माहिती देताना दौंड तालुका नाभिक संघाचे अध्यक्ष गणेश साळुंके म्हणाले की, आजपर्यंत या मागणीला कुठल्याही प्रकारची दाद मिळत ...
याबाबत माहिती देताना दौंड तालुका नाभिक संघाचे अध्यक्ष गणेश साळुंके म्हणाले की, आजपर्यंत या मागणीला कुठल्याही प्रकारची दाद मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आज दौंड तालुक्यातील नाभिक समाज राज्य शासनाकडून काही ना काही फुल ना फुलाची मदत देईल या आशेच्या किरणाने सलून कारागीर नजरा रोखून बसला गेला आहे. आज सलून व्यावसायिकदार देखील कोरोनाच्या महामारीने मरणाच्या दारात उभा आहे. यांना देखील राज्य शासनाने मदतीचा हात पुढे करून या समाजाला लस उपलब्ध करून द्यावी ही आमची मागणी आहे. आज तमाशा कलावंतांना मानधन मिळावे म्हणून राज्य सरकार झगडत आहे. रिक्षावाल्यांंना देखील राज्य सरकारने आर्थिक मदतीचा हात दिला आहे. आदिवासी समाजाला आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. मग हा सलून कारागीर समाज का या राज्य सरकारला दिसत नाही. दौंड तालुक्यात आज मोठ्या प्रमाणावर नाभिक समाजाचे जाळे आहे. सलून दुकानावर अवलंबून असलेला आर्थिक व्यवहार कसा तोडायचा हाच गहन प्रश्न हा समाजापुढे उभा राहिला आहे. आमच्या मागणीची राज्य शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन सलून कारागिरांच्या बाबतीतील प्रश्न मार्गी लावावा ही आमची राज्य सरकारला हात जोडून विनंती आहे.
--
चौकट : राज्य सरकारला आमची हात जोडून विनंती......सलून दुकानावर अवलंबून असलेला आर्थिक व्यवहार कसा तोडायचा हाच गहन प्रश्न हा समाजापुढे उभा राहिला आहे. आमच्या मागणीची राज्य शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन सलून कारागिरांच्या बाबतीतील प्रश्न मार्गी लावावा ही आमची राज्य सरकारला हात जोडून विनंती आहे.
- गणेश साळुंके (अध्यक्ष,दौंड तालुका नाभिक संघ)