‘न्यूड’ कलाकृतीतील भाव निरपेक्षच : भगवान रामपुरे; जलतरंगांच्या सुरावटीवर साकारले शिल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:43 AM2017-11-20T11:43:16+5:302017-11-20T11:48:48+5:30

विख्यात जलतरंग वादक सुरमणी मिलिंंद तुळाणकर यांच्या जलतरंगाच्या सुरावटींवर वाजवलेल्या राग अहिर भैरवमधील आलाप व भैरवी रागातील धून या पार्श्वभूमीवर दीड-पावणेदोन तासामध्ये शिल्प प्रत्यक्षात रंगमंचावर साकारले.

'Nude' artwork comportment is disinterested: bhagwan Rampure; built Craft | ‘न्यूड’ कलाकृतीतील भाव निरपेक्षच : भगवान रामपुरे; जलतरंगांच्या सुरावटीवर साकारले शिल्प

‘न्यूड’ कलाकृतीतील भाव निरपेक्षच : भगवान रामपुरे; जलतरंगांच्या सुरावटीवर साकारले शिल्प

Next
ठळक मुद्देकलेमध्ये चांगले-वाईट असे काही नसतेच : भगवान रामपुरे जलतरंगाच्या सुरावटींवर साकारले दीड-पावणेदोन तासामध्ये शिल्प

पुणे : ‘कलाकाराच्या घडणीत त्याच्या विचारांचा, मानसिकतेचा मोठा वाटा असतो. अगदी ‘न्यूड’ साकारतानाही निरपेक्ष भावच कलाकृतीत उतरतात. कलेमध्ये चांगले-वाईट असे काही नसतेच,’ असे प्रतिपादन विख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांनी केले. निमित्त होते विवेक नारळकर आयोजित ‘शिल्प तरंग’ कार्यक्रमाचे.  
शिल्पकार भगवान रामपुरे यांना प्रत्यक्ष शिल्प साकारतानाचा अद्भुत कलाविष्कार याप्रसंगी पुणेकरांनी अनुभवला. विख्यात जलतरंग वादक सुरमणी मिलिंंद तुळाणकर यांच्या जलतरंगाच्या सुरावटींवर वाजवलेल्या राग अहिर भैरवमधील आलाप, जोड, झाला; तसेच राग गुजरी तोडीमधील बंदिश व भैरवी रागातील धून या पार्श्वभूमीवर दीड-पावणेदोन तासामध्ये शिल्प प्रत्यक्षात रंगमंचावर साकारले.
डॉ. मंदार परांजपे यांनी रामपुरे व तुळाणकर यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी बोलताना रामपुरे म्हणाले, ‘जे. जे. स्कूलमध्ये असताना मी काढलेली स्केचेस पाहून मी शिल्पकलेकडे वळावे, असे शिक्षकांनी सांगितले. ’ 
‘आई आणि तान्हं बाळ असे वात्सल्य या विषयावरील शिल्प मुंबईत साकारत असतानाच दंगली उसळल्या. त्या वातावरणातच पूर्ण झालेल्या शिल्पातील तान्ह्या बाळाच्या चेहºयावरील निरागसतेचे भाव तसेच राहिले; पण आईच्या चेहºयावर वात्सल्याऐवजी नकळतपणे चिंतेचे, काळजीचे भाव प्रकटले. 
अशाच एका शिल्पात साकारलेल्या लहान मुलाचे एका तेरा महिन्याच्या मुलीने जवळ जाऊन चुंबन घेतले. तो प्रसंग मला माझ्या शिल्पाला मिळालेला सर्वोच्च पुरस्कार आहे असे वाटते.’ अरुण काकतकर यांनी कलाकारांचे स्वागत केले.  
 

Web Title: 'Nude' artwork comportment is disinterested: bhagwan Rampure; built Craft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे