Pune Corona News: पुणे शहरात सक्रिय रुग्णसंख्या २ हजारांच्या पार; बुधवारी २५७ कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 06:17 PM2021-09-08T18:17:07+5:302021-09-08T18:17:17+5:30
आज विविध तपासणी केंद्रांवर १० हजार ६९८ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.४० टक्के इतकी आढळून आली आहे.
पुणे : शहरात बुधवारी २५७ कोरोनाबाधित आढळून आले असून, २४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर १० हजार ६९८ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.४० टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार १५२ इतकी आहे. आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ५ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २१२ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९० इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३२ लाख ३ हजार २६३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९७ हजार ४१२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८६ हजार २९८ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९६२ जणांचा मृत्यू झाला आहे.