ब्रेकडाऊनची संख्या पुन्हा वाढली

By admin | Published: September 28, 2016 04:50 AM2016-09-28T04:50:18+5:302016-09-28T04:50:18+5:30

गेल्या काही महिन्यांत तब्बल एक ते दीड हजाराने कमी झालेला पीएमपीच्या ब्रेकडाऊनचा आकडा पुन्हा वाढला आहे. त्यामुळे रस्त्यावरील बसच्या फेऱ्याही कमी होत असून

The number of breakdowns has increased again | ब्रेकडाऊनची संख्या पुन्हा वाढली

ब्रेकडाऊनची संख्या पुन्हा वाढली

Next

पुणे : गेल्या काही महिन्यांत तब्बल एक ते दीड हजाराने कमी झालेला पीएमपीच्या ब्रेकडाऊनचा आकडा पुन्हा वाढला आहे. त्यामुळे रस्त्यावरील बसच्या फेऱ्याही कमी होत असून, त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
दर महिन्याला सुमारे ५,५०० असलेला ब्रेकडाऊनचा आकडा विविध उपाययोजना राबवून प्रशासनाने जून २०१६मध्ये ३ हजार ८०० पर्यंत खाली आणला होता. मात्र, मागील दोन महिन्यांत तो पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली असून, आॅगस्ट २०१६मध्ये हा आकडा पुन्हा ४ हजार ४३५च्या घरात पोहोचला आहे.
गाड्यांची नियमित देखभाल होत नसल्याने उर्वरित गाड्याही अनेकदा मार्गावरच बंद पडतात. ही बंद पडणाऱ्या गाड्यांची संख्या आॅक्टोबर २०१५पर्यंत सरासरी ५ हजार ५०० होती. त्यानंतर गाड्यांची नियमित देखभाल-दुरुस्तीसाठी चांगल्या प्रकारचे साहित्य तसेच देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण घेऊन हे ब्रेकडाऊन कमी करण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून ब्रेकडाऊन ३,००० ही मोहीम हाती घेण्यात आली. त्यानंतर ब्रेकडाऊनचे प्रमाण डिसेंबर २०१५नंतर लक्षणीयरीत्या कमी झाले होते.

४ हजारांचा आकडा पार
जुलै २०१६मध्ये ३९०५, तर आॅगस्टमध्ये ४ हजार ४३५ व २७ सप्टेंबरअखेर ब्रेकडाऊनने ४ हजारांचा आकडा पार केला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: The number of breakdowns has increased again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.