Video - दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या 50 हजाराने घटली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 12:14 PM2019-02-28T12:14:59+5:302019-02-28T13:25:45+5:30
मागील वर्षीपेक्षा यंदा राज्य माध्यमिक मंडळातर्फे इयत्ता 10वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 50 हजाराने कमी झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
पुणे - मागील वर्षीपेक्षा यंदा राज्य माध्यमिक मंडळातर्फे इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 50 हजाराने कमी झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शुक्रवार (1 मार्च)पासून इयत्ता 10वीची परीक्षेला राज्यात सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी राज्यभरात मिळून 17 लाख 813 विद्यार्थीपरीक्षा देणार आहेत अशी माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.
यंदाच्या परिक्षेसंबंधी ठळक मुद्दे
- यंदा बदललेल्या अभ्यासक्रमावर पहिल्यांदाचं परीक्षा होत आहे. राज्यभर 4हजार 874 परीक्षा केंद्रावर परीक्षा होत आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही नियोजित वेळेआधी अर्धा तास उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
- प्रात्यक्षिक परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना 23 मार्च आणि 25 मार्च रोजी ही परीक्षा देण्याची शेवटची संधी असेल.
- जिल्हानिहाय एक किंवा 2 आणि राज्यस्तरावर 10 असे एकूण 60 समुपदेशक नेमले आहेत.
- व्हॉट्सऍप आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल होणारे वेळापत्रक चुकीचे असू शकते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरील वेळापत्रकचं खरे मानावे असेही त्यांनी सांगावे.
- संपूर्ण राज्यात 252 भरारी पथकांची नेमणूक.
- आलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी प्रत्येक विभागासाठी हेल्पलाईन उपलब्ध
- राज्यभरातील 4हजार 874 परीक्षा केंद्रावर परीक्षा होत आहे.
- यंदा विशेष विद्यार्थी म्हणून तीन विद्यार्थ्यांना सुविधा देण्यात आल्या असून त्यापैकी एकाला लॅपटॉप देण्यात आलेला आहेत. तर अंध, मूक, कर्णबधीर दोन विद्यार्थिनींना दुभाषक आणि लेखनिक देण्यात आलेला आहे.
- यंदा 8830 दिव्यांग विद्यार्थी देणार परीक्षा.
- मुंबई केंद्रातून सर्वाधिक 3 लाख 76 हजार 691परीक्षार्थी तर सर्वांत कमी कोकण विभागातून 35 हजार 304 विद्यार्थी देणार परीक्षा.