शहरात कोरोना रुग्णवाढीचा आकडा पुन्हा साडेपाच हजाराच्या पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:11 AM2021-04-07T04:11:48+5:302021-04-07T04:11:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात कोरोनाबाधितांच्या वाढीचा आकडा मंगळवारी पुन्हा साडेपाच हजाराच्या पुढे गेला असून, आज केलेल्या १७ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात कोरोनाबाधितांच्या वाढीचा आकडा मंगळवारी पुन्हा साडेपाच हजाराच्या पुढे गेला असून, आज केलेल्या १७ हजार ३८९ तपासणीमध्ये ५ हजार ६०० कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी ३२़२९ टक्के इतकी आहे़
शहरात आजही मृत्यूचा आकडा ३० च्या पुढे असून, आज शहरातील ३८ जणांचा तर शहरात उपचार घेणाºया ९ अशा ४७ जणांचा मृत्यू झाला आहे़ शहरातील कोरोनाबाधितांच्या तुलनेत मृत्यूची टक्केवारी ही रविवारी १़़८४ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ४ हजार ९९ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ तर ९१५ रूग्ण हे गंभीर आहेत़ तर आज दिवसभरात ३ हजार ४८१ कोरोनाबाधितही आज कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील सक्रिय रूग्णांचा आकडा ४४ हजार ८२२ इतका झाला आहे़
शहरात आजपर्यंत १५ लाख ९३ हजार ७३६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ९९ हजार ७२१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ४९ हजार ३७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ५२६ झाली आहे़
==========================