शहरात कोरोना रुग्णवाढीचा आकडा पुन्हा उच्चांकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:12 AM2021-04-09T04:12:00+5:302021-04-09T04:12:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात कोरोनाबाधितांच्या वाढीच्या संख्येने गुरूवारी पुन्हा उच्चांक गाठला असून, दिवसभरात ७ हजार १० नवे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात कोरोनाबाधितांच्या वाढीच्या संख्येने गुरूवारी पुन्हा उच्चांक गाठला असून, दिवसभरात ७ हजार १० नवे रूग्ण आढळून आले आहेत़ आज दिवसभरात २३ हजार ५९५ जणांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २९़ ७० टक्के इतकी आहे़
शहरातील मृत्यूचा आकडाही ५० च्या पुढे गेला असून, शहरातील ४३ जणांचा तर शहरात उपचार घेणाऱ्या पुण्याबाहेरील १६ अशा ५९ जणांचा आज दिवसभरात मृत्यू झाले आहेत़ शहरातील कोरोनाबाधितांच्या तुलनेत मृत्यूची टक्केवारी आज १़़ ७९ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ४ हजार ४६५ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ तर ९९९ रूग्ण हे गंभीर आहेत़ तर आज दिवसभरात ४ हजार ९९ कोरोनाबाधितही कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील सक्रिय रूग्णांचा आकडा ४८ हजार ९३९ इतका झाला आहे़
शहरात आजपर्यंत १६ लाख ४३ हजार ४५१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ३ लाख १२ हजार ३८२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ५७ हजार ८३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ६१० झाली आहे़
==========================