Pune Corona News: सोमवारी शहरात कोरोनाबधितांची संख्या पन्नासच्या आत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 07:05 PM2021-11-15T19:05:52+5:302021-11-15T19:05:59+5:30
सोमवारी रविवारच्या तुलनेत नव्या कोरोनाबधितांची संख्या निम्म्याहून कमी झाली आहे
पुणे : शहरात दिवाळीनंतर कोरोना संख्या वाढलेली असताना, सोमवारी रविवारच्या तुलनेत नव्या कोरोनाबधितांची संख्या निम्म्याहून कमी झाली आहे. आज दिवसभरात केवळ ४८ नवे रुग्ण आढळून आले असून, दिवसभरात ४ हजार ८१ जणांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी १.१७ टक्के आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी चारपर्यंत ५४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज ३ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ७५९ झाली आहे.
आजपर्यंत ३६ लाख २० हजार ४३५ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ५ लाख ५ हजार ४११ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ९५ हजार ५६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ९७ कोरोनाबाधित गंभीर असून, ७४ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ९ हजार ८५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.