पुणेकरांनो काळजी घ्या! कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 05:18 AM2020-11-19T05:18:53+5:302020-11-19T05:20:04+5:30

CoronaVirus : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात साधारणत: शहरात दिवसाला दीडशे ते दोनशे कोरोनाबाधित आढळून येत होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून यात वाढ होत आहे.

number of corona patient increasing in pune | पुणेकरांनो काळजी घ्या! कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली

पुणेकरांनो काळजी घ्या! कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दिवाळीनंतर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढीस लागली आहे. बुधवारी तपासणी झालेल्यांमध्ये साधारणत: १४ टक्के व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. दिवसभरात २ हजार ७४३ जणांची कोरोना चाचणी केली. यापैकी ३८४ जण पॉझिटिव्ह आढळून आले.


ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात साधारणत: शहरात दिवसाला दीडशे ते दोनशे कोरोनाबाधित आढळून येत होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून यात वाढ होत आहे. १० टक्क्यांच्या आत आलेला शहराचा पॉझिटिव्ह दर आता  १३ टक्क्यांच्या आसपास गेला आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचारपर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ३९२ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी २६० जण व्हेंटिलेटरवर आहेत, तर एक हजाराच्या आत आलेली ऑक्सिजनवरील रुग्ण संख्या पुन्हा एक हजारांच्या पुढे गेली 
आहे. आजमितीला १ हजार १ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. बुधवारी ७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी एकजण पुण्याबाहेरील आहे.

७ लाख तपासण्या
पुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ७३ हजार ८७९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी १ लाख ६५ हजार ४२६ जण पॉझिटिव्ह आले. 
nयातील १ लाख ५६ हजार ६३९ जण कोरोनामुक्त झाले, तर आत्तापर्यंत ४ हजार ४०१ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: number of corona patient increasing in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.