भोर तालुक्यात महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या ५५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:11 AM2021-03-16T04:11:24+5:302021-03-16T04:11:24+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन योग्य त्या उपाययोजना करत असून, नागरिकांचे प्रबोधन करत आहे. भोर तालुक्यात आजअखेर कोरोनाबाधितांची संख्या २१६४ ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन योग्य त्या उपाययोजना करत असून, नागरिकांचे प्रबोधन करत आहे. भोर तालुक्यात आजअखेर कोरोनाबाधितांची संख्या २१६४ झाली असून, यातील २१२३ जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना घरी सोडण्यात आले सोडले आहे.तर सध्या ५५ कोरोनाबाधितांवर उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हिड केंद्रात तसेच भोर शहरातील रथखाना आणि नसरापूर येथील सिद्धिविनायक हाॅस्पिटलमधील कोव्हिड उपचार केंद्रात उपचार करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घेऊन नियमांचे पालन करावे.
भोर शहरात आजपर्यंत ४२० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, उपचारानंतर ३८६ जणांना घरी सोडण्यात आले असून, वर्षभरात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील १२ हजार ९६८ जणांचे स्वॅब तपासले असून, तालुक्यात आत्तापर्यंत ७९ जणांचा कोरोनाने बळी घेतला असून, शासनाच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या नागरिकांकडून सुमारे ४ लाख ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे तनपुरे यांनी सांगितले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन भोरचा आठवडे बाजार शहराच्या बाहेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर भरवण्याचा निर्णय उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार अजित पाटील यांनी घेतला असून, मंदिरे, मंगल कार्यालये,गावातील यात्रा यांवर नियंञण ठेवून कोणत्याही ठिकाणी ५० पेक्षा अधिक लोकांना उपस्थित राहू नये म्हणून बंधन घालण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे तनपुरे यांनी सांगितले.