पुरंदरच्या कोरोना बाधितांची संख्या १५० पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:11 AM2021-04-04T04:11:36+5:302021-04-04T04:11:36+5:30
आज शनिवार दि.०३ एप्रिल रोजी सासवडच्या शासकीय लाँबमध्ये ३३२ संशयीत व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली पैकी १४६ व्यक्तींचे अहवाल ...
आज शनिवार दि.०३ एप्रिल रोजी सासवडच्या शासकीय लाँबमध्ये ३३२ संशयीत व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली पैकी १४६ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. सासवड शहर ९२, ग्रामीण भागात सोनोरी ४, शिवरी, वाघापूर, हिवरे प्रत्येकी ३, खळद, वीर, माहुर, चांबळी, पारगाव, कोडीत, माळशिरस प्रत्येकी २, पांगारे, जेजुरी, गराडे, सिंगापूर, रिसे, बेलसर, भिवरी, सटलवाडी, सोमर्डी, दिवे, भिवडी, राजेवाडी, पिंपळे, टेकवडी, परिंचे, वनपुरी, वाळुंज, सुपे, साकुर्डे प्रत्येकी १, तर तालुक्या बाहेरील वडकीनाला २, भोंगवली (ता.भोर), पिंपळे गुरव, भेअराईनगर येथील १ रुग्ण बाधित झाले आहेत. सासवड शहर ९२ ग्रामीण भागातील ४८ तर तालुक्या बहेरील ६ असे एकुण १४६ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. जेजुरी येथील शासकीय लॉबमध्ये ५१ संशयीत व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली पैकी १५ रुग्णांचे अहवाल बाधित आले आहेत. जेजुरी १०, सासवड २, ग्रामीण भागातील वाल्हा, वीर, सुपे प्रत्येकी १ असे १५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.