गुरुवारी कोरोनाबाधितांचा आकडा नऊशेच्या पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:11 AM2021-03-05T04:11:05+5:302021-03-05T04:11:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात गुरुवारी कोरोनाबाधितांची वाढ कायम राहिली असून, आज नव्याने ९०४ कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात गुरुवारी कोरोनाबाधितांची वाढ कायम राहिली असून, आज नव्याने ९०४ कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ आठवड्याच्या सुरुवातीला असलेल्या रुग्णांच्या तिप्पट वाढ आज दिसून आली आहे़ शहरातील विविध प्रयोगशाळांमध्ये दिवसभरात ७ हजार ५८५ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी ही ११़ ९१ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार: सायंकाळी सहावाजेपर्यंत शहरातील विविध रुग्णालयांत ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ६३१ इतकी असून, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २९४ इतकी आहे़ दिवसभरात ५६२ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले असून, शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ही ५ हजार ८८६ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ११ लाख ७० हजार ३८३ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ५ हजार ५५३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९४ हजार ७९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २ जण पुण्याबाहेरील आहेत़ आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८७६ जणांचा मृत्यू झाला आहे़
==========================