गुरुवारी कोरोनाबाधितांचे प्रमाण अधिक : ४ हजार ८९५ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:15 AM2021-04-30T04:15:00+5:302021-04-30T04:15:00+5:30
पुणे : शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या नव्या कोरोनाबाधितांची संख्येपेक्षा अधिक होती़ मात्र गुरूवारी कोरोनाबाधितांचा आकडा ...
पुणे : शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या नव्या कोरोनाबाधितांची संख्येपेक्षा अधिक होती़ मात्र गुरूवारी कोरोनाबाधितांचा आकडा कोरानामुक्त होणाऱ्यांपेक्षा थोडा वाढला असून, आज दिवसभरात नवे ४ हजार ८९५ कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ४ हजार ६८८ इतकी आहे़
आज दिवसभरात २० हजार ५०१ जणांनी तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २३़८७ टक्के इतकी आहे. तर आज दिवसभरात ९१ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २८ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.५३ टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ६ हजार ६९५ कोरोनाबाधित रुग्ण हे आॅक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ३९२ रूग्ण हे गंभीर आहेत़ शहरात आत्तापर्यंत २१ लाख ७ हजार ५९१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख १५ हजार ३९९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी ३ लाख ६४ हजार ४६४ कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ही ४४ हजार २०३ इतकी आहे़
-----------