सावधान! दिवाळीनंतर पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत होतेय वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 08:55 PM2021-11-12T20:55:38+5:302021-11-12T20:57:26+5:30
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात ५ हजार ३७१ जणांची तपासणी करण्यात आली. आज शहरातील एका तर शहराबाहेरील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ९ हजार ८० इतकी झाली आहे. (Pune Corona Update)
Pune Corona Update| शहरात दिवाळीनंतर नवीन कोरोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात वाढताना दिसत असल्याने पुणेकरांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी नवीन कोरोनाबाधित रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. आज दिवसभरात ८६ नवे कोरोनाबाधित आढळून आले असल्याने, शहरातील कोरोना सक्रिय रूग्णांची संख्या ७६० झाली आहे तर दिवसभरात ६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत़.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात ५ हजार ३७१ जणांची तपासणी करण्यात आली. आज शहरातील एका तर शहराबाहेरील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ९ हजार ८० इतकी झाली आहे.
विविध रूग्णालयांमध्ये सध्या कोरोनाचे ११३ गंभीर रूग्ण असून, ७१ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत ३६ लाख ७ हजार ३२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातले ५ लाख ५ हजार १६३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ४ लाख ९५ हजार ३२३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.